Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै १०, २०२२

ऑस्ट्रेलिया निवासी माजी विद्यार्थ्यांच्या मुलीचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रमातून साजरा



जुन्नर /आनंद कांबळे 

   सावरगाव ( ता.जुन्नर )येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय चे माजी विद्यार्थी संतोष शांताराम काशिद नोकरीच्या निमित्ताने परिवारासह ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहेत.  जवळपास ३/४ वर्षानंतर मायभूमीत आल्यानंतर प्रथम शाळेला भेट दिली. मुलगी अनया हिचा वाढदिवस मुला-मुली समवेत साजरा केला.

    एस. एस. सी.च्या परिक्षेत गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थिनीचा सन्मान चिन्ह , शाल , श्रीफळ देऊन  कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

  चिंचोली ( काशिद ) येथील हा विद्यार्थी ऑस्ट्रेलिया येथे अभियंता म्हणून काम करतो .तेथे भारतीय लोकांना एकत्र करून मुलांसाठी चार मराठी शाळा सुरू केल्या आहेत त्याचबरोबर सर्वांना एकत्र करून शिवजयंती , गणेशोत्सव ,स्वातंत्र्य दिन साजरा करतात. पत्नी मनीषा ही देखील अभियंता असून महिला दिन , हळदी कुंकू , रक्षाबंधन कार्यक्रम घेतात .

    या प्रसंगी संचालक माधवराव बाळसराफ , डिंसेंट फाउंडेशन चे प्रकल्प समनव्यक फकिर आतार ,मुख्याध्यापक साळुंके , माजी सनदी अधिकारी शंकर कचरे , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश भागवत , संतोष काशिद , संदिप पानसरे , मनिषा काशिद आदि मान्यवरांसह विद्यार्थी शिक्षक , कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश ढमढेरे , स्वागत अरुणाआल्हाट मॅडम तर आभार ज्येष्ठ शिक्षक जयकुमार कडाळे यांनी व्यक्त केले 

माजी विद्यार्थी संतोष यांनी किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी वेंडिंग व डिस्ट्रॉय मशिन , ई-लर्निंग सॉफ्टवेअर,कोरोना ग्रस्त मुलांना मदत , हे खरोखर कौतुकास्पद आहे असे मुख्याध्यापक अनिल साळुंके यांनी सांगितले .

https://www.khabarbat.in/2020/06/kashid-family-of-chincholi-gave-free.html

        #sagarkashid #sapnapatil #marathibeatz

Santosh Kashid |


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.