Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २०, २०२२

जुन्नरच्या संस्कृती दहीहंडी उत्सवास नागरिकांची मोठी गर्दी




चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने

जुन्नर : आनंद कांबळे

जुन्नर शहरातील शंकरपुरा पेठ येथे संस्कृती प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये जुन्नर शहरातील आबाल-वृद्धासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनामुळे दोन वर्षाच्या काळानंतर यंदा प्रथमच हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला.
संस्कृती प्रतिष्ठान जुन्नर यांनी केलेल्या नियोजनातील छत्रपती संघर्ष ढोल-ताशा पथकाने विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
 या उत्सवास ओतुर, जुन्नर शहर व परिसरातील गोविंदा पथकांनी मानवी साखळी रचत दहीहंडीला सलामी दिली तर मयूर महाबरे यांच्या गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला.
    याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरज नानावटी, उपाध्यक्ष सनी कर्पे, सेक्रेटरी सुरज खत्री, माजी अध्यक्ष सुमित लांडे, मार्गदर्शक अनिल रोकडे, सल्लागार राजेंद्र खत्री, सतिष कवडे, अरुण तांबे, रुपेश दुबे, दीपक वाळुंज, शरद भगत, गौतम सुरडकर आदी उपस्थित होते.


Krishna Janmashtami Gokul ashtmi dahihandi

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.