Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै १४, २०२२

आई -वडील दैवत आहे , त्यांची स्वप्नं पूर्ण करा: संतोष काशिद


 

आई -वडील दैवत आहे , त्यांची स्वप्नं पूर्ण करा: संतोष काशिद


जुन्नर /आनंद कांबळे 

     बाळांनो , आई -बाबांनी हे सुंदर जग आपल्याला दाखविल आहे, जीवन खूप सुंदर व अनमोल आहे.असेच यशवंत , गुणवंत व्हा,चांगल्या मित्रांची संगत करा,आई ,वडील व गुरूंचा आदर करा , त्यांची स्वप्नं पूर्ण करा ,असे ऑस्ट्रेलिया निवासी संतोष काशिद यांनी मुलांना मार्गदर्शन केले. Santosh kashid

         चिंचोली ( काशिद ) ता.जुन्नर येथील श्री समर्थ मधुकरराव विद्यालयात एस. एस. सी.चा १००% निकाल लागल्याबद्दल गुरूदक्षिणा फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिक्षकाचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून काशिद बोलत होते .

     संस्थेचे उपाध्यक्ष बबनराव काशिद हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .या वेळी विद्यालयातील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक - शिक्षकेतर वृंद यांना सन्मान चिन्ह , शाल , गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच अनया या विद्यार्थिनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य व बिस्किटे वाटण्यात आली .

     या प्रसंगी श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर चे माजी मुख्याध्यापक एफ .बी.आतार , संतोष काशिद ,सामाजिक कार्यकर्ते संदिप पानसरे ,संचालक अजित काशिद , तुकाराम चव्हाण , भास्कर काशिद ,मनिषा काशिद आदि मान्यवरांसह पालक , विद्यार्थी , शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक विठ्ठल गडगे यांनी तर उपशिक्षक विठ्ठल भोर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

-----------------------

ऑस्ट्रेलिया निवासी माजी विद्यार्थ्यांच्या मुलीचा वाढदिवस शैक्षणिक 

https://www.khabarbat.in/2022/07/santosh-kashid-house.html

Santosh kashid  

Australian


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.