
पोलिसाची पोलीस स्टेशनमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...


चंद्रपूर/प्रतिनिधी:
मूल: तालुक्यातील गांगलवाडी येथिल शेतकरी परशुराम सकाराम बोलमवार वय 42 या शेतक—याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
मृतक शेतकरी परशुराम बोलमवार याला तीन मुली, पत्नी व आई असा परीवार असुन अनु्क्रमे मोठी मुलगी 5 व्या वर्गात, 2 —या वर्गात व पहिल्या वर्गात आहे. त्याला दीड एकर शेती असून शेतीसाठी त्याने कर्ज घेतले होते.या मृतक शेतक—याने 2008—9या वर्षात कर्ज घेतले होते अशी माहिती आहे. यावर्षी पाणी पाऊस नसून धानाला मावा,तुळतुळा,खोड किडी या रोगाने ग्रासले असून शेतक—याचे पिकही झाले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आला असतांनाच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी केली असल्याने शेतक—याला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य संजय पाटील मारकवार व मूल नगर परीषदेचे नगरसेवक विनोद कामडे यांनी लगेच घटनास्थळी भेट घेतली व घटनेचा रोष व्यक्त करत शेतक—याच्या कुटंबाला सरकारने भरीव मदत करावी असे मत व्यक्त केले. मूल तालुका अर्थमंत्री व जिल्हृयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असून त्यांचे क्षेत्रात या शेतक—याची आत्महत्या होत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.


ठाणे/ प्रतिनिधी-
गोडबंदर रोडवरील एका कंत्रटदाराचा कारमध्ये मृतदेह आढळून आला आहे. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव संकेत जाधव असे आहे. घटनेची माहिती पोलिसांना ंमिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन कारमधील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. गाडीमध्ये एक रिव्हाल्वर आणि एक चिट्टी मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार स्वताच्याच रिव्हाल्वरने आत्महत्या केली असवी असे प्रथमीक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.गाडीत संकेतच्या मृतदेहाजवळ पोलिसांना चिट्टी मिळाली आहे. या चिट्टीमध्ये “विद्या मला माफ कर, मला धंद्यात नुकसान झालं” अशा वाक्याचा उल्लेख असल्याची माहिती मिळाली.
जाधव हा ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता. कासारवडवली पोलिस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.