मूल: तालुक्यातील गांगलवाडी येथिल शेतकरी परशुराम सकाराम बोलमवार वय 42 या शेतक—याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
मृतक शेतकरी परशुराम बोलमवार याला तीन मुली, पत्नी व आई असा परीवार असुन अनु्क्रमे मोठी मुलगी 5 व्या वर्गात, 2 —या वर्गात व पहिल्या वर्गात आहे. त्याला दीड एकर शेती असून शेतीसाठी त्याने कर्ज घेतले होते.या मृतक शेतक—याने 2008—9या वर्षात कर्ज घेतले होते अशी माहिती आहे. यावर्षी पाणी पाऊस नसून धानाला मावा,तुळतुळा,खोड किडी या रोगाने ग्रासले असून शेतक—याचे पिकही झाले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आला असतांनाच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी केली असल्याने शेतक—याला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य संजय पाटील मारकवार व मूल नगर परीषदेचे नगरसेवक विनोद कामडे यांनी लगेच घटनास्थळी भेट घेतली व घटनेचा रोष व्यक्त करत शेतक—याच्या कुटंबाला सरकारने भरीव मदत करावी असे मत व्यक्त केले. मूल तालुका अर्थमंत्री व जिल्हृयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असून त्यांचे क्षेत्रात या शेतक—याची आत्महत्या होत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
कुटुंबीयांच्या धाकामुळे बारावीतील दोन मुलींची आत्महत्या - दोन दिवसांपूर्वी शाळेतून निघून गेल्या होत्या न
चंद्रपुरात माजी संघ प्रचारकाची आत्महत्याचंद्रपूर/प्रतिनिधी:चंद्रपूर येथील समाधी वॉर्
राज्य महिला आयोग मूल पोलिसांना जाब विचारणारमूल/ प्रतिनिधी -गिरीश महाजन यांनी शहादा येथे महि
नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्यानागपूर/प्रतिनिधी:नागपुरात दहावीत शिकणाऱ्या विद्या
पोलिसाची पोलीस स्टेशनमध्येच गळफास घेऊन आत्महत्या यवतमाळ:विशेष प्रतिनिधी: शहर पोलीस स्टेशनमध
कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या वरोरा/प्रतिनिधी: रोगराईने पिके नष्ट झाल्याने
- Blog Comments
- Facebook Comments