Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

आत्महत्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्महत्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, मार्च ०७, २०२०

 पोलिसाची पोलीस स्टेशनमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसाची पोलीस स्टेशनमध्येच गळफास घेऊन आत्महत्या


यवतमाळ:विशेष प्रतिनिधी:
शहर पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या
राजू खंडुजी उईके (55)असे हेडकॉन्स्टेबल चे नाव
गुन्हे शाखेत होते कार्यरत
कास्ट वैलिडिटी सब्मिट करण्याचे आदेश 
रात्री मेन लाईनमध्ये पेट्रोलिंग करून बजावले कर्तव्य
कर्तव्य संपल्यानंतर
पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी केली आत्महत्या 
मृत्यूपूर्व चिठ्ठी ही ठेवलेली होती लिहून
Image result for yavatmal city police station
आपण अतिरिक्त होणार आणि आपली नोकरी जाणार या भीती पोटी व आजारामुळे त्रस्त असल्याचे मृत्यूपूर्व चिठ्ठी मध्ये लिखाण.


मंगळवार, सप्टेंबर २५, २०१८

नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर/प्रतिनिधी:
नागपुरात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत बंद करून गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर येथे हि घटना घडली.दर्शन संजय कडू वय १४ वर्ष इसापूर, ता. सावनेर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून सिक्रेट हार्ट अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तो १० विचे शिक्षण घेत होता .काही दिवसा अगोदर शिक्षके त्याला सर्व विध्याथ्यांसमोर रागावल्या होत्या. पेपरला (परीक्षा) बसू देणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली होती. या प्रकारामुळे दर्शने टेन्शन घेतले असल्याचे समजते आहे. दर्शनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.



  

शनिवार, ऑगस्ट ०४, २०१८

अशोक अग्रवाल आत्महत्या प्रकरण;चारही आरोपींना जामीन मंजूर

अशोक अग्रवाल आत्महत्या प्रकरण;चारही आरोपींना जामीन मंजूर



चंद्रपूर/प्रतिनिधी:
स्वामी फ्युएल कंपनीत लेखापाल अशोक अग्रवाल यांच्या आत्महत्या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. अशोक अग्रवाल यांच्या आत्महत्तेनंतर हे सर्व आरोपी फरार होते.पोलीस त्यांच्या मागावर होती. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी या चारही जणांना जामीन मिळाला.या चारही जणांवर गुन्हे दाखल झाले तेव्हापासून हे चारही आरोपी फरार होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोडक यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा  युक्तिवाद संपल्यानंतर शनिवारला न्यायालयाने या चारही जणांना जामीन मंजूर केला आहे.या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना ८ ऑगस्ट परियंत  रामनगर पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहत पोलीस कारवाईत मदत करण्याचे व साक्षीदारावर कोणताही दबाव आणू नये अशे आदेश दिले असल्याची माहिती आहे,या प्रकणात झालेल्या अटकपूर्व जमिनेकडे सर्वांचे लक्ष लागले.

मंगळवार, जुलै ३१, २०१८

 गोंडखैरीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या

गोंडखैरीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या

बाजारगाव/गजेंद्र डोंगरे:
 कळमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेले गोंडखैरी येथे स्वःताच्या घरीच तरुणाने विष घेऊन केली आत्महत्या सविस्तर वृत्त असे की मृतक चिंटू ऊर्फ जयंता शंकर अत्करी वय २२ वर्षे राहणार वार्ड क्रंमाक ३ हा मद्यपान करुण नेहमीप्रमाणे रात्री उशीरा साडेदहाच्या सुमारास घरी यायचा व वडीलाला पैशाची मागणी करायचा अगर पैशे दिले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी नेहमीच वडीलांना द्यायचा. असेच सोमवार ला रात्री साडेदहाच्या दरम्यान मद्य प्राशन करुण आला व बडबड करु लागला. घरच्यांनी त्यांचेवर लक्ष न देता, त्याला तसेच सोडून त्याच्या खोलीमध्ये बडबड करु लागला व आतमधून दरवाजाची कडी बंद करुन झोपला.
नेहमीप्रमाणे वडील मंगळवार (दि.३१/जूलै) ला सकाळी पाचच्या दरम्यान झोपून उठले असता खिडकीतून पाहले तर निद्रा अवस्थेत आढळून आला. व आतमधून दरवाजाची कडी बद असून त्याला आवाजाने उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही. घरा लगत स्थानिक सरपंचाला व परिसरातील पोलीस पाटिल आणी स्थानिकांच्या मदतीने खिडकीतून दरवाजाची कडी काढण्यात आली. तर काय गार झोपीच गेला व काळाने झडपच घेतली. त्यांच्या तोंडातून फेस वाहत होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला हलचल करुण उठवण्याचा प्रयत्न केला.पण त्याआधीच काळाने झडप घेतली.
ताबडोब कळमेश्वर पोलीसांना सूचना देण्यात आली. मंगळवार सकाळी ६.३० वाजता उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे मृतकाला रवाना करण्यात आले. दुपारी १.००वाजता त्याचे स्थानिक मोक्षधाम येथे अत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे.त्यांच्या पच्छात आई-वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे.





बुधवार, जून २०, २०१८

 चंद्रपुरात माजी संघ प्रचारकाची आत्महत्या

चंद्रपुरात माजी संघ प्रचारकाची आत्महत्या

Former RSS pracharak Santosh Dikshit suicides | चंद्रपुरातील माजी प्रांत प्रचारक संतोष दीक्षित यांची आत्महत्याचंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील समाधी वॉर्डातील रहिवासी संतोष दीक्षित यांनी स्वत:च्या घरातच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. संतोष दीक्षित हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व धर्म जागरण समितीचे सदस्य होते.
गेल्या एप्रिल महिन्यात संतोष दीक्षित यांची पाच वर्षांची मुलगी समिधाला कुलरचा शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला होता. मुलीच्या विरहात आपण गोळ्या खाऊन आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी मृत्यूपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, असे सांगण्यात येत आहे.