शंकरपूर (प्रतिनिधी):
चिमुर तालुक्यातील शंकरपूर जवळ असलेल्या काजळसर या गावातील शंकरराव तुळशीराम खोब्रागडे यांनी स्वतःच्या राहत्या घरी सायंकाळ सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
सविस्तर वृत्त असे की काल दि 15 फेब्रुवारीला शंकरराव तुळशीराम खोब्रागडे अंदाजे वय 60 वर्षे शेतावर काम करण्यासाठी गेले होते तसेच त्यांच्या कुटूंबातील सर्व सदस्य शेती वर त्याच्या सोबत काम करीत होते दुपार नंतर ते एकटेच घरी आले तेव्हा घरी कुणीही नव्हते. त्यांनी घरात आत जाऊन स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली.
सायंकाळी शेतावरून काम आटोपून त्याची पत्नी घरी आली आणि आतमधील दृश्य पाहताच त्या बेशुद्ध झाल्यात. काही क्षणात स्वतःला सावरत त्यानी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे लगेच लोकांचा जमाव घराभोवती झाला. या आत्महत्या चे नेमके कारण अजूनपर्यंत कळू शकले नाही.