Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १७, २०१८

दारू कारवाईतून वाचविण्यासाठी पोलीस कर्मचार्यांनी मागितली लाच; अन स्वताच सापडला ACB च्या जाळ्यात

 गडचांदूर/प्रातिनिधी:
गडचांदूर येथे पोलीस विभागात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला गडचांदूर येथे अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही येथे कार्यरत असलेल्या ईसमाने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात दिले आहे.
तक्रारदार हे गडचांदूर येथील रहिवासी असून ते त्यांच्या मित्रासोबत मोटरसायकलने  तेलंगाना सीमेवरील भंबारा  येथे गेले होते परत येत असताना त्यांनी आपल्यासोबत स्वताःह पिण्यासाठी  गाडीच्या डिक्कीत IB कंपनीच्या दारुच्या बाटल्या सोबत आल्या होत्या .गडचांदूर येथे पोहोचताच गडचांदूर येथील रामकृष्ण हॉटेल समोर गडचांदूर पोलिसात कार्यरत असलेल्या येथे पोलीस कर्मचारी  नारायण वाघमोडे  यांनी तक्रारदाराची गाडी थांबवली आणि गाडीची तपासणी केली असता त्यांना डिक्कीत IB कंपनीच्या 3  दारुच्या बाटल्या सापडल्या त्यामुळे कारवाई न   करण्यासाठी पोलीस कर्मचारी  नारायण वाघमोडे 25 हजार रुपयाची लाच मागितली. हि रक्कम  जास्त असल्यामुळे तक्रारदाराला ही रक्कम देणे शक्य नव्हते त्यामुळे १५००० रुपयावर हा मसला फीट झाला. व तत्काळ ७००० रुपये देण्यात आले ,व उर्वरित रक्कम दुसऱ्या दिवशी देण्याचे ठरविले दुसरा दिवस मिळताच चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत दुसऱ्या दिवशी उर्वरित ८००० रुपये देताना पोलीस कर्मचारी नारायण वाघमोडे बक्कल नंबर.२१४० याला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष रंगेहात अटक केली.या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

सदर कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे,  ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात मनोहर एकोणकर,अजय बागेसर, महेश मांढरे, मनोज पिदूरकर,यांनी पार पडली.

    अधिक  ताज्या घळामोडी  वाचण्यासाठी  या लिंकवर  क्लिक करा
    https://kavyashilpnews.blogspot.in/


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.