सिमेंट सिटी म्हणून महाराष्ट्र सह भारतभर प्रसिद्धी मिळालेल्या गडचांदूरतील तरुणांची मात्र आजही थट्टाच दिसते आहे.ज्या बाबीमुळे हि मोठी प्रसिद्धी मिळाली त्याच शहरातील तरुणांना सध्या रोजगारासाठी जिल्ह्यासह पर राज्यात कामासाठी जावे लागते हि मोठी शोकांतीका मानावी लागेल.हि बाब येथील राजकीय व सत्ताधार्यांची उदासीनता आहे कि ,मजबुरी हे आज पर्यंत येथील तरुणांना कळले नाही.
फक्त निवडणुका आल्या कि राजकारण्यांना वोट मागण्याची नेम्मून तरुणांची आठवण येते.परंतू आश्वासन देऊन आपले काम झाले कि आपली मनमानी सुरु असेच काहीशे चित्र मागील काळात झाल्याचे दिसते.
कोरपना या आदिवासी बहुल व मागास समजल्या जाणाऱ्या तालुक्यात ऐक नाही तर तब्बल चार सिमेंट प्रकल्प अस्थित्वात आहे.या दृष्टीकोनातून बघीतले तर येथील प्रत्येक तरुणांच्या हाताला मागेल तेवढा रोजगार मिळेल.परंतु हि एक सर्वात मोठी व लाजवेल अशी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
गडचांदूर शहरात अगदी लोकवस्तीत नवीन प्रकल्पाचे कार्य पूर्णत्वास आले आहे.परंतु येथील अनेक तरुणांना एक मोठी आशा होती कि आपल्याला काही ना काही रोजगार हातास गवसेल परंतु ती आशा स्वप्नातस राहिली .ग्राम पंचायतीने नाहरकत प्रमाण पत्र देताना शहरातील बेरोजगार आणि पाहिजे त्याला रोजगार शहराच सौन्दर्यीकरन या बाबीच आश्वासन दिल गेले.परंतु आपल्या मुठीत काही राजकारण्यांनी धागे दोरे लावून आपापली माणसे लावून डल्ला मारून अनेक स्थानिक बेरोजगारावर्ती एकप्रकारची कुऱ्हाडच मारली आहे.
मागील काही दिवसात प्रकल्पात रोजगार भरतीसाठी पडताळणी केली.यामध्ये शहरातील स्थानिक तरुण बेरोजगारांना हाताला काम लागत नसल्याच्या प्रतिक्रिया आल्या.
सध्या गडचांदूर हा परप्रांतीयांचा एक प्रकारे अड्डाच बनला आहे. दररोज या शहरात परप्रांतीयांचे जत्थे उतरताना दिसते.या बाबीमुळे गड्चान्दुरची संख्या झपाट्याने वाढत असून शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे.शहरात जागा कमी आणि लोकसंख्या वाढत असून याचा नाहक त्रास स्थानीक राहणाऱ्या नागरिकांना होत आहे.प्रकल्पामध्ये यांचे धागेदोरे अगदी जवड चे असल्याने तरुणांचा रोजगार कमी होत असल्याचे येथील तरुणांचे म्हनणे आहे.मागील काही दिवसात बाहेरील जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील तरुणांची येथे धावपळ झाली.यातील अनेक तरुण बाहेरील होते.परंतु गड्चान्दुरातील तरुणांना रोजगार का नाही याची अजून पर्यंत काही कुणाला कल्पना सुधा सुचली नाही.
गडचांदूरकरांना होत आहे विकारांचा स्पर्श