Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शंकरपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शंकरपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, फेब्रुवारी १७, २०१८

काजळसर येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

काजळसर येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

शंकरपूर (प्रतिनिधी): 
           चिमुर तालुक्यातील शंकरपूर जवळ असलेल्या काजळसर या गावातील शंकरराव तुळशीराम खोब्रागडे यांनी स्वतःच्या राहत्या घरी सायंकाळ सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. 
        सविस्तर वृत्त असे की काल दि 15 फेब्रुवारीला शंकरराव तुळशीराम खोब्रागडे अंदाजे वय 60 वर्षे शेतावर काम करण्यासाठी गेले होते तसेच त्यांच्या कुटूंबातील सर्व सदस्य  शेती वर त्याच्या सोबत काम करीत होते दुपार नंतर ते एकटेच घरी आले तेव्हा घरी कुणीही नव्हते. त्यांनी घरात आत जाऊन  स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली.
        सायंकाळी शेतावरून काम आटोपून त्याची पत्नी घरी आली आणि आतमधील दृश्य पाहताच त्या बेशुद्ध झाल्यात. काही क्षणात स्वतःला सावरत त्यानी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे लगेच लोकांचा जमाव घराभोवती झाला.    या आत्महत्या चे नेमके कारण अजूनपर्यंत कळू शकले नाही.

शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

अपघातात शिक्षिका जखमी

अपघातात शिक्षिका जखमी

शंकरपूर/प्रतिनिधी:
 शंकरपूर येथून जवळच असलेल्या लावारी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका कमल मेश्राम  ह्या सकाळची शाळा आटोपुन आंबोली वरून शंकरपूर मार्गे आपल्या स्वतःच्या गावाकडे जात असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले त्यात त्या गंभीर जखमी झाल्या रस्त्याने ये-जा प् करणाऱ्या लोकांनी त्यांना शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल केले शंकरपूर् आंबोली महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून नेहमी या मार्गावर लहान-मोठे अपघात होत असतात तरीही संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत



शुक्रवार, नोव्हेंबर ०३, २०१७

शंकरपूर परिसरात 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु होणार

शंकरपूर परिसरात 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु होणार

आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश

शंकरपूर / प्रतिनिधी:
चिमूर तालुक्यातील शंकरपूर डोमा जी प क्षेत्र परिसरात विदुयत सिंगल फेज सुरु असल्याने शेतकरी वर्गास अडचण निर्माण झाली असताना साठगाव येथील शेतकऱ्या नि आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचेकडे निवेदन देऊन 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु करण्याची मागणी केली होती याची दखल घेत आमदार किर्तीकुमार भांगडीया यानी एम एस इ बी च्या अधिकारी वर्गा सोबत चर्चा केली असता अखेर 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु राहणार असल्याची माहिती सांगण्यात आली

 शंकरपूर परिसरात सिंगल फेज विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकरी वर्गा ला पाणी करण्यासाठी अडचण निर्माण होत होती धान पीकला पाणी करण्यासाठी रात्री वेळ होती परंतु रात्री च्या वेळेस वन्य प्राणी ची भीती आहे त्यामुळे रात्री पाणी करणे अडचणीचे होते यासाठी साठगाव येथील शेतकऱ्यांनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे कडे निवेदन दिले असता एम एस इ बी चे अधिकारी सोबत चर्चा करून 24 तास  थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु राहणार असल्याचे सागण्यात आले  असल्याने शेतकऱ्यांचे पाणी समस्या सुटणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे
यावेळी  आमदार किर्तीकुमार भांगडीया  भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्यामजी हटवादे ,तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर ,डॉ दीपक यावले ,वसन्त वारजूकर ,आदी उपस्थित होते