Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ०४, २०२३

शिक्षक भरतीसाठी 15 मेपर्यंत अर्ज करा; पदाकरीता अटी व शर्ती वाचा | Government School Teacher Recruitment

चंद्रपूर,दि. 04: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय शाळांमध्ये सत्र 2023-24 करीता घड्याळी तासिका तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षकांची शासन निर्णयानुसार नेमणूक करावयाची आहे. याकरीता इच्छुक अहर्ता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 15 मे 2023 पर्यंत राहील. (Government School Teacher Recruitment)



उच्च माध्यमिक शिक्षक या पदाकरीता इंग्रजी, मराठी, गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र या विषयासह एम.ए., एम.एससी, बी.एड शैक्षणिक अहर्ता धारण केलेली असावी. माध्यमिक शिक्षक पदाकरीता विज्ञान, गणित, इंग्रजी व मराठी विषयासह बी.एससी बी.एड, प्राथमिक शिक्षक पदाकरीता सर्व विषय घेता यावे यासह बी.ए. डि.एड तर पदवीधर प्राथमिक शिक्षक पदाकरीता मराठी व इंग्रजी विषयासह बी.ए. डी.एड शैक्षणिक अहर्ता धारण केलेली असावी. मानधन शासन निर्णयानुसार देय राहील. Government School Teacher Recruitment


पदाकरीता अटी व शर्ती:

आश्रमशाळेच्या 20 किलोमीटर परिसरातील स्थानिक उमेदवारांना शैक्षणिक अहर्ता व अनुभवानुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या पत्रानुसार, आवश्यकतेनुसार भरावयाची पदे कमी/अधिक करण्याचे तसेच इतर बाबतीत वेळेवर बदल करण्याचे, भरती प्रक्रिया रद्द करण्याचे तसेच पदे संपुष्टात आणण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांना राहील. असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एस.जी.बावणे यांनी कळविले आहे. Government School Teacher Recruitment


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.