Monthly meeting of Kisan Ekta Sangh at Selu
किसान एकता संघाची गुरुवार, ४ मे रोजी वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात मासिक सभा पार पडली. ही सभा महाराष्ट्र प्रदेश संरक्षक व प्रभारी सुनीता येरणे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष मालती मुळे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तात्यासाहेब मत्ते, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष पुष्पा शिंदे, युवती आघाडी विदर्भ अध्यक्ष कल्याणी मुळे, वर्धा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मंदा मोघे, वर्धा जिल्हा महिला आघाडी महासचिव रेखा चरडे, चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष स्वाती मांदाडे, महिला आघाडी नागपूर शहर उपाध्यक्ष संगीता अंबारे, महिला आघाडी नागपूर शहरसचिव सविता रंगारी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
सभेत किसान एकता संघाच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती देणे, किसान एकता संघाचा वर्धा जिल्ह्यात विस्तार करणे, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करणे, अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय अशाविविध विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी नरेंद्र करोले वर्धा, संजय पुसाम सेलू, दीपक देवतळे सेलू, विजय रितोडे सेलू, मंगला कावळे सेलू, ममता बघेल सेलू व मोठ्या संख्येत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.