Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर ०३, २०२२

आमदार किशोर जोरगेवार मध्यरात्री २ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर |



चंद्रपूर | मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (kishor Jorgewar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्याशी मध्यरात्री दोन वाजता भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नाला घेऊन त्यांनी  मुंबईतील वर्षा बंगल्यावर ही भेट घेतली. मध्यरात्री झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांचा विषय मुख्यमंत्र्यांना समजावून सांगितला. 



विविध विकास कामांना घेऊन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार मुंबईला गेले आहेत. मात्र मुख्यमंत्री यांच्या विभागाशी संबंधित असलेल्या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला. मात्र त्यांचा दौरा व्यस्त होता. भेटीच्या वेळी करिता आमदार किशोर जोरगेवारयांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना विनंती केली. पण त्यावेळी रात्रीची अकरा वाजले होते. दिवसभराच्या धावपळीमुळे मुख्यमंत्री रात्री भेट देणार अशक्य वाटत होते. मात्र अशातच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्न संदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मागितलेल्या भेटीच्या विनंतीला अखेर होकार आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दोन वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी जवळपास या दोघांमध्ये पंधरा मिनिटे मतदार संघातील विविध विषयांवर देखील चर्चा झाली. राज्याच्या प्रगतीसाठी मध्यरात्रीसुद्धा मुख्यमंत्री भेट देतात, जनतेच्या कार्याला न्याय देतात. हे बघून अतिशय आनंद झाला, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. राज्याची प्रगती ही मुख्यमंत्र्याच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. राज्याला कार्यक्षम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाभले आहेत, असेदेखील किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

kishorJorgewar-eknathShinde


पेज नेव्हिगेशन



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.