Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर ०३, २०२२

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी ११४ कामांची यादी | Sudhir Mugantiwar


जिल्ह्याचा सर्वांगीण, सर्वोत्तम विकास हेच ध्येय

'मीट द प्रेस'मध्ये मुनगंटीवारांनी साधला माध्यमप्रतिनिधींशी संवाद



चंद्रपूर : अर्थमंत्री यापूर्वीच्या पाच वर्षांच्या काळात जिल्ह्यात अनेक विकासकामे करण्यात आली आहे. आता पुन्हा अडीच वर्ष मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या अडीच वर्षांत मोठी विकासकामे करायची असून ११४ कामांची यादी तयार आहेत. आरोग, कृषी, शिक्षण अशा विविध क्षेत्रात जिल्हा स्वयंपूर्ण करायचा असून, जिल्ह्याचा सर्वांगीण आणि सर्वोत्तम विकास हेच ध्येय असल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमात सांगितले.


जिल्ह्याच्या विविध विकासकामांवर त्यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधत काही सूचनाही मागविल्या. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या अजेंड्यावर या मीट द प्रेसमध्ये माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तलावांची संख्या असून, मासेमारी व्यवसायातून मोठी रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे सांगत यासाठी लवकरच धोरण तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर, गडचिरोली दोन्ही वनजिल्हे आहेत. या जिल्ह्यात रोजच मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना घडतात. पोटाच्या उपजीविकेसाठी अनेकांना जंगलात जावे लागते. अशावेळी वन्यप्राणी मानव संघर्ष होऊन अनेकांची बळी जातो.या घटनांमुळे मृतकाचे कुटुब उघड्यावर पडते. त्यामुळे मृतकांच्या कुटुंबीयांना मोठी मदत मिळावी यासाठी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आतापर्यंत मृतकांच्या कुटुंबीयांना मिळणारी १५ लाखांची मदत २० लाख करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तेंदूपत्ता मजुरांना रायल्टी देण्याचा देण्याचा निर्णय घेतला असून, ही रायल्टी २० कोटींवरून ७० कोटींपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती मुनगंटीवारांनी यावेळी दिली.

शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम करायचे असून, स्वतंत्र शैक्षणिक धोरणे असलेला चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा असेल, यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. आरोग्याच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण करायचा असून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे. चार नवीन पीएचसी अत्याधुनिक सुविधासह निर्माण करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात रिक्त पदे भरण्यात आली असून, पुढील काळात आणखी काही पदे भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. फोर्टीज हॉस्पिटलच्या माध्यमातून शेकडो लहान मुलांवर महागड्या शस्त्रक्रिया नि:शुल्क करण्यात आल्या आहेत. याच कंपनीने एक साप्टवेअर उपलब्ध करून दिले असून, या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय यंत्रणा अद्ययावत करून रुग्णांचा डाटाबेस तयार केल्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅन्सर हॉस्पिल, विमानतळ, महाकाली मंदिराचे सौंदर्यीकरण, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात रिसर्च सेंटर आदी कामांना गती देण्यात आली असून, येणाऱ्या काही महिन्यात ही कामे सुरू झालेली दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात अत्याधुनिक क्रिकेट अकादमीसाठी प्रयत्न करू असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मविआ सरकारने कमी केलेल्या डीपीडीसीच्या निधीत पुन्हा वाढ करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तत्पूर्वी पत्रकार संघाचे अध्यक्ष मझहर अली, संघटन सचिव योगेश चिंधालोरे यांच्या हस्ते नामदार सुधीर मुनगंटीवार यांना शाल, श्रीफळ आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.


Sudhir Mugantiwar


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.