शिक्षक मतदार बांधव...
गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट आणि विद्या परिषदेच्या निवडणुका येत्या 4 सप्टेंबरला 2022 ला होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीत चार पॅनल्स भाग घेत आहेत. मतदानासाठी सर्वच पॅनलचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत आले असतील. आम्ही "नुटा" या संघटनेच्या वतीने तुम्हाला नुटाच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देण्यासाठी आणि या निवडणुकीत विजय करण्यासाठी विनंती करीत आहोत.
*नुटाच्याच उमेदवारांना मतदान का?
2. "नुटा" या संघटनेमुळेच नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठातील शेकडो शिक्षक नोकरीत कायम झाले आहेत. 'नेट-सेट' मुक्त शिक्षकांसाठी सतत 30 वर्ष, नुटा संघटनेने लढा दिला आहे.
3. नेट-सेट मुक्त शिक्षकांची लढाई नुटा संघटनेने रस्त्यावर, महाराष्ट्राच्या सभागृहात, विद्यापीठांच्या सिनेटमध्ये, महाराष्ट्रात विविध उच्च न्यायालयात आणि आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयात लढलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील लढाई सुद्धा येत्या काही महिन्यात, शिक्षकच जिंकतील अशी स्थिती आहे.
4. महाराष्ट्रात खाजगी महाविद्यालयात अनेक प्रबंधन जेव्हा जेव्हा प्राध्यापकांच्या विरोधात भूमिका घेतात, तेव्हा तेव्हा त्यांच्या नोकऱ्यांना सुरक्षित ठेवण्याचे काम नुटा संघटनेने केले आहे. नागपूर विद्यापीठात नुटा संघटनेच्या वतीने तयार केले गेलेले आणि विद्यापिठात पास केलेले "स्टॅटयूट 53" मुळे कोणतेही खाजगी महाविद्यालयीन व्यवस्थापन शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा आणू शकत नाही. हेच स्टॅटयूट अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठात जसे चे तसे लागू होते.
5. नुटा संघटनेने प्राध्यापकांच्या मदतीने महाराष्ट्र शासनाचे विरोधात सतत आंदोलने केली आहेत. 90 च्या दशकात 52 दिवसांचा संप, 2013 चा 94 दिवसांचा परीक्षेवरील बहिष्कार आंदोलन, प्राध्यापकांनी त्तांच्या मागण्यासाठी स्वतःला केलेली अटक इत्यादी गोष्टी अजूनही सुरूच आहेत. आजच्याही घडीला नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात, यूजीसीच्या धोरणात 2018 ला महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून केलेल्या बदलाच्या विरोधात ही आंदोलने सुरूच आहेत. भविष्यात "न्यू एज्युकेशन पॉलिसी" मुळे प्राध्यापकांचे नोकऱ्यांवर सुद्धा अनेक धोके नुटा ला दिसत आहेत, भविष्यात प्राध्यापकांच्या नोकऱ्या सुद्धा प्राचार्यांसारख्या कदाचित पाच वर्षांसाठीच होणार आहेत. या विरोधात आत्तापासूनच लढणे गरजेचे आहे.
6. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक म्हणून आज आपण अगदी सुखी आहोत, आमच्या नोकऱ्या स्थिर आणि सुरक्षित आहेत, सर्वांना महिन्यात वेळेवर पगार मिळतो, आणि तो बँकेच्या खात्यात जमा होतो. महाविद्यालय किंवा मॅनेजमेंट कडून पगार घेण्याची गरज उरत नाही. हे सर्व मागील पन्नास वर्षांतील नुटाच्या परिश्रमाचे फळ आहे. हे कसे विसरता येईल?
7. प्राध्यापकांना मिळणाऱ्या हक्काच्या 10 आकस्मिक रजा, वैद्यकीय रजा आणि इतरही विविध रजा मिळवण्यासाठी नुटाने अनेक आंदोलने केलेली आहेत. 11 मे 2009 रोजी शासनाने एक शासन निर्णय काढून 10 नैमित्तिक रजा 8 वर आणल्या होत्या, शासनसोबत यशस्वी पाठपुरावा करून त्या पुन्हा 10 करता आल्यात.
8. प्राध्यापकांचे प्लेसमेंट शासनाचे अधिकारी पैसे घेतल्याशिवाय करत नाहीत ही कुजबुज होती, नुटा च्या प्रयत्नामुळे एका सहसंचालकाला आपल्याच एका प्राध्यापकाच्या मदतीने यशस्वीपणे अँटी करप्शन ब्युरो ला सुपूर्द करण्यात आले. प्राध्यापकांचे वेळेवर प्रमोशन्स व्हावेत यासाठी त्यांच्या रिफ्रेशर कोर्सची सीमा 2018 पर्यंत यशस्वीपणे आपण वाढवू शकलो.
9. अमरावती नागपूर आणि गोंडवाना या तीनही विद्यापीठांत नुटा चे पदाधिकारी, सतत शासनासोबत विविध मुद्द्यांवर पत्र व्यवहार करीत असतात, त्यांचे प्रश्न सिनेट, मॅनेजमेंट कौन्सिल इत्यादी सदनात यशस्वीपणे मांडीत आहेत. आणि प्राध्यापकांना न्याय मिळवून देत आहेत.
10. 2005 नंतरच्या प्राध्यापक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन संदर्भात नुटा च्या आमसभे मध्ये जुनी पेन्शनच्या संदर्भात ठराव घेऊन (महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ)MFUCTO नी सुद्धा जुनी पेन्शनचा ठराव घेतला. आज जुनी पेन्शन संघटने चा लढा देण्याचे कार्य सुरू केले.
11. नुटा ही फक्त प्राध्यापकांची संघटना आहे, या संघटनेच्या सदस्यांचा कोणताही धर्म नाही, जात नाही ते फक्त शिक्षक आहेत. जातीच्या नावावर मतं मागायची संस्कृती नुटाची नाही. आम्ही कोणतेही गाजर तुम्हाला आत्ता दाखवत नाही. पार्टी, पैसा, पाकीट यांचीही गाजर तुम्हाला आम्ही दाखवत नाहीत.