Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट २८, २०२२

Maharashtra | chandrapur Landslide News | Aam aadami party अमराई वार्ड क्रमांक ०१ ला स्थलांतरित करा | आम आदमी पार्टी घूग्घुसची खासदारांकडे तसेच प्रशासनाकडे मागणी....




घूग्घुस नगरपरिषद अंतर्गत येणारे अमराई वार्ड क्रमांक ०१ येथील रहिवासी श्री. गजानन रामचंद्र मडावी यांचे घर दिनांक २६/०८/२०२२ रोजी सायंकाळी ०५ वाजता पूर्णपणे १०० फूट जमिनीच्या आतमध्ये कोसळले. अशीच एक घटना मागील काही वर्षांपूर्वी त्याच परिसरामध्ये १५०-२०० मीटर अंतरावरती घडली. त्यावेळेस सुद्धा कुठलीही जीवित हानी झाली नाही. परंतु अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे अमराई वार्ड मध्ये राहात असलेल्या नागरिकांचा जीव धोक्यात आहे व भीतीचे वातावरण पसरले आहे.याची तात्काळ दखल घेत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे तसेच जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी तसेच शहराध्यक्ष इंजिनियर अमित बोरकर यांच्या नेतृत्वात घटनास्थळी भेट दिली.तसेच तेथील नागरीकांची ज्या शाळेमध्ये व्यवस्था करन्यात आली त्याचीही पाहणी करन्यात आली.
          आम आदमी पार्टी घूग्घुस द्वारा अमराई वार्ड मधील नागरिकांना स्थलांतरित करण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळुभाऊ धानोरकर तसेच प्रशासनाकडे  करण्यात आली.  Maharashtra | chandrapur Landslide News | Aam aadami part

             या निवेदनावर २४ तासामध्ये निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळू भाऊ धानोरकर यांनी दिले.
             यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.  Maharashtra | chandrapur Landslide News | Aam aadami part


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.