Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २३, २०२१

गंगा जमुनात देहव्यापार करायला जाणाऱ्या चंद्रपूरच्या त्या महिलेची नागपुरात सुटका

नागपूर : 
पतीने केलेल्या उपेक्षेमुळे हतबल झालेल्या चंद्रपूरच्या एका 30 वर्षीय महिलेने चंद्रपूर सोडून नागपुरात येऊन गंगा जमुना परिसरात वेश्‍याव्यवसाय करण्याचा अजब निर्णय घेतला. गुरूवारी दुपारी ३० वर्षे वयोगटातील महिला मनिषा (काल्पनिक नाव) गणेशपेठ बसस्थानकावर उतरली. नाकी-डोळी छान आणि कपड्यांवरून सधन घरची असल्याची दिसत होती.

पतीच्या कमाईवर जीवन जगत असल्याचे तिच्या डोक्यात बसले. त्यामुळे रागाच्या भरात तिने गंगाजमुनात जाऊन वेश्‍याव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ती चंद्रपुरातून थेट नागपुरात पोहचली आणि गंगाजमुनाची वाट धरली.

तिने ऑटोला हात दिला. आणि ऑटो वाल्याला म्हणाली मला गंगाजमुनात जायचं आहे तिथे सोडा, असे म्हणत ऑटो चालक गोंधळला. त्याला संशय आल्याने त्याने पाण्याची बाटल्या घेण्याचा बहाणा करीत थेट भरोसा सेलच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ यांना फोन केला. संशयित महिला असून ती गंगाजमुनात घेऊन जाण्याबाबत म्हणत असल्याचे सांगितले.महिला पोलिस येत पर्यंत फोटो वाला बस स्टॅन्ड परिसरातच ऑटो गोल गोल फिरवत राहिला.

लगेच दामिनीचे पथक थेट ऑटोचालकाने सांगितलेल्या रस्त्यावर पाठवले. दामिनीचे वाहन दिसताच सुनील यांनी ऑटो थांबविला आणि महिलेला ताब्यात दिले. दामिनी पथकाने महिलेला वाहनात बसविले आणि भरोसा सेलमध्ये आणले आणि तिची समज घालण्यात आली.

भरोसा सेलने दिलेल्या माहितीनुसार मनिषाच्या आईने दुसरे लग्न केले तर वडिलानेही दुसरा ठाव धरला. दोन वर्षांची असताना मनिषा आणि तिची बहिणी आजीकडे राहू लागल्या. आजीचा मृत्यू झाल्यानंतर दोघ्याही बहिणींनी एकमेकींना आधार दिला. मनिषाचे लग्न झाले आणि पतीसह सुखी संसार सुरू झाला. परंतु, तिच्याच जीवलग मैत्रिणीने तिच्या पतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केले. त्यामुळे पुन्हा एकाकी झालेल्या मनिषा नैराश्‍यात गेली. तिचा पुरूषांवरील पुरता विश्‍वास उडाला.

पुन्हा नव्यावे थाटला होता संसार
चंद्रपुरात राहणाऱ्या अविवाहित प्रमोदला मनिषाची हकीकत कळली. प्रमोद हा केंद्र शासनाच्या एका खात्यात नोकरीला आहे. त्याने तिला पुन्हा नव्याने संसार थाटण्याची विनंती केली. दोघांनी नव्याने संसार थाटला. लग्नाला दोन वर्षे झाले तरीही त्यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे मनिषाची चिडचिड व्हायची. कधी-कधी पतीसोबत वादही व्हायचे. परंतु, समजदार असलेल्या प्रमोदमुळे संसार सुरू सुरळित होता.

प्रमोद आणि मनिषात असाच ११ नोव्हेंबरला वाद झाला. पतीच्या कमाईवर जीवन जगत असल्याचे तिच्या डोक्यात बसले. त्यामुळे रागाच्या भरात तिने गंगाजमुनात जाऊन वेश्‍याव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ती थेट नागपुरात पोहचली आणि गंगाजमुनाची वाट धरली. ऑटोचालक सुनील भोकरे हा देवाच्या रुपात मिळाला. त्याच्या आणि दामिनीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला....आणि ती ढसाढसा रडायला लागली.

भरोसा सेल प्रभारी रेखा संकपाळ आणि दामिनी पथकातील ललिता उन्हाळे, अनिता वरकडे, गुंजन रामटेके यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. तिच्या पती आणि बहिणीला बोलावून घेतले. भरोसा सेलमध्ये येताच त्यांना मनिषाने घेतलेला निर्णय सांगितला. शब्द कानी पडताच मनिषा, तिचा पती आणि बहिण तिघेही ढसाढसा रडायला लागले. त्यांनी दामिनी पथकाचे आभार मानले आणि परत चंद्रपूर गाठले...


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.