Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २३, २०२१

पक्ष संघटन बळकट करा-माजीमंत्री बडोले.

पांढरी जि.प.क्षेत्रातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न.



संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.

नवेगावबांध दि.23 नोव्हेंबर:-
दि.२२नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टी सडक अर्जुनीच्या वतीने पांढरी जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत संघटनात्मक स्तरावरील विविध विषयावर उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, संघटना बळकट करण्याच्या संदर्भाने खासदार सुनिल मेंन्ढे,माजी मंत्री राजकुमार बडोले,आमदार डॉ.परिणय फुके,संघटन महामंत्री बाळाभाऊ अंजनकर यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी यापुढील काळातही जिल्हा परिषद क्षेत्रात भारतीय जनता पार्टी ही सर्वस्तरावर क्रमांक १ ची पार्टी राहील यासाठी अधिक गतीने पक्ष वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.पुढे माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले म्हणाले,राज्य सरकार अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक करतोय.शेतकरी धान रोगांवरील गादमाशीच्या प्रादुर्भावाने अडचणीत असताना सरकारने त्यांच्याकडे पाठ फिरवली.धानाचा बोनस जाहीर केलेला नाही.सरकार कष्टकऱ्यांना नाही, दलालांना पैसे देत असल्याची टिका केला.यावेळी खासदार सुनिल मेंन्ढे,आमदार डॉ.परिणय फुके,माजी आमदार खोमेश रंहागडाले,संघटन महामंत्री बाळाभाऊ अंजनकर,जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर,तालुकाध्यक्ष अशोक लंजे,शेषराव गिरीपुंजे,विनायक कापगते,विजय बिसेन,हर्ष मोदी,गिरीधारी हत्तीमारे,परमानंद बडोले,शिशिर येळे,राजेश कठाणे,विश्वनाथ रंहागडाले,शिला चौव्हाण,डाॅ.बबन कांबळे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास बागडकर,गौरेश बावनकर,यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्तागण उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.