नागपूर, जुलै ३१: नागपुरात आधुनिक, पर्यावरण पूरक, स्वस्त आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करतानाच, महा मेट्रो शहराचा कायापालट देखील करीत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशाचे भौगोलिक मध्य असलेल्या झिरो माईल स्मारकाजवळ २० मजली इमारतीच्या बांधकामाकरता महा मेट्रोने निविदा काढली आहे. महा मेट्रोच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरचा भाग असलेले झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशन याच इमारतीत स्थित असेल.
या २० मजल्यांपैकी पैकी २ भूमिगत मजले पार्किंग करता आणि ऊर्वरित १८ मजले इतर विविध कामांकरिता वापरले जातील. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ८९.८१ मीटर उंच स्टेशन बांधण्याची परवानगी महा मेट्रोला दिली आहे. महा मेट्रोच्या पार्किंग व व्यावसायिक बांधकामा करण्याच्या धोरणांतर्गत पीपीपी मॉडेल वर आधारित या वस्तूचे बांधकाम होणार आहे.
या वास्तूचे बांधकामा करू इच्छिणाऱ्या कंत्राटदाराला स्टेशनच्या वरती २,९०,००० चौरस फुट बांधकाम करायचे आहे. या इमारतीत पार्किंग करिता बांधल्या जाणाऱ्या २ भूमिगत मजल्यांशिवाय २ मजले – तळ मजला आणि मेझानैन मजला - देखील पार्किंग करता वापरले जाणार आहे. या व्यतिरिक्त स्टेशनच्या कोंकोर्स परिसरात तिकीट विक्री आणि किरकोळ विक्री करता दुकानांची सोय असेल. या इमारतीत एकूण १३ मजल्यांचा वापर व्यावसायिक कामाकरिता होणार आहे.
संबंधित कंत्राटदार या इमारतीत हॉटेल, बँक्वे हॉल, ऑफिस आणि इतर बांधकाम करू शकतो. या संबंधी कंत्राटदार निर्णय घेऊ शकतो. हे बांधकाम, आधी सांगितल्याप्रमाणे, देशाच्या मध्य भागी असलेल्या झिरो माईल स्मारकाजवळ होणार आहे. या स्मारकाचे बांधकाम १९०७ मध्ये तत्कालीन ब्रिटीश सरकारने केलेल्या ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिक सर्वेक्षणादरम्यान झाले आहे. देशांतर्गत विविध शहरांमधील अंतर मोजण्याकरिता हे सर्वेक्षण झाले होते. पार्किंग करता असलेल्या एकूण चार मजल्यांपैकी एक मजला कंत्राटदाराकरता असेल.
व्यावसायिक कारणाकरिता झिरो माईल स्टेशनच्या वरच्या भागात बांधकाम व पार्किंग परिसराचे संचालना संबंधीची निविदा महा मेट्रोच्या संकेत स्थळावर लाइव्ह असून २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत या निविदेत भाग घेता येते. या संबंधीचे प्री-बीड बैठक १२ ऑगस्ट २०२१ रोजी मेट्रो भवन येथे होणार आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LIMITED
Zero Mile Freedom Park station to have 20 floors
Nagpur, July 31: Along with providing a modern, fast, safe and cheap mode of transport to Nagpur, Maha Metro is changing the skyline of Nagpur. It has floated a tender for construction of a 20-floor tower near Zero Mile, Civil Lines. The Zero Mile Freedom Park station will be housed inside this building.
The tower will have 18 storeys above the ground in addition to which there will be 2 basement floors and thus 20 floors. Airports Authority of India (AAI) has sanctioned a height of 89.81 meters for the building. The project has been conceived under parking-cum-commercial development theme of Maha Metro on public private partnership (PPP) basis.
The concessionaire will have to construct 2,90,000 square feet above the station. It comprises of 4 parking floors, which includes 2 basements, one ground level and one mezzanine level, one station concourse level for ticketing and retail shops, one platform, one technical floor and 13 floors for commercial space above the station.The concessionaire can construct hotels, banquet halls, restaurants, offices, etc or a combination of these. The choice will be of the operator.
The tower is being built near the iconic Zero Mile Stone monument, as it is the centre of India and the most important landmark of Nagpur. The monument was built in 1907 by the Great Trigonometrical Survey of India. It was used by the British Government to measure all distances.
Metro has already developed four levels of parking – two in the basement, one ground floor and one mezzanine floor. Of this the ground floor will be the dedicated parking floor for the concessionaire while the remaining three floors will be interoperable between concessionaire and Maha Metro.
The construction period is 3 years and the concessionaire will operate the tower for 60 years (including the construction period).
The tender for ‘Development of Commercial Space above Zero Mile station including operation and maintenance of parking on public private partnership basis’ is live on Maha Metro’s e-tender portal and last date of submission of bids is September 21, 2021. The pre-bid meeting will be held on August 12, 2021, at Metro Bhavan, opposite Deekshabhoomi, Nagpur.