Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ३१, २०२१

दलितांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही @AdvSandeepTajne


 

दलितांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही

बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजनेंचा आरोप



मुंबई३० जुलै,

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या संकटात सापडलेल्या चिपळूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण लवाजम्यासह भेट दिलीपंरतुचिपळूनपासून अगदी ३० किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात असलेल्या पोसरेत (बौद्धवाडी) दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या १८ दलित कुटुंबियांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाहीमुख्यमंत्र्यांची जातीवादी मानसिकता यावरून दिसून येतेअसा घणाघात बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शुक्रवारी केलापोझरे बौद्धवाडीला त्यांनी आज भेट देवून मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना पक्षाकडून आर्थिक मदत केली.


विशेष म्हणजे अस्मानी संकटात मृत्यूमुखी पडलेल्या दलितांवर अंत्यविधी करण्यासाठी गावातील सवर्णांनी जागा सुद्धा दिली नाहीअसा गंभीर आरोप अँड.ताजने यांनी केला आहेदेशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्ष झाली आहेतहे वर्ष आपण स्वातंत्र दिनाचा अमृत महोत्सव म्हणून साजरे करणार आहोतअसे असताना देखील दलितांना अंत्यविधीसाठी जागा दिली जात नसेलतर महाराष्ट्राला पुरोगामी कसे म्हणायचेअसा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.

 

स्थानिक आमदाराकडून दलितांना अंत्यविधीसाठी जागा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहेपंरतुप्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची जागा अंत्यविधीसाठी देण्यात आली नव्हतीअसे यावेळी ताजने यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेमुख्यमंत्र्यांनी यासंबंधी संवेदनशीलता दाखवून पीडित कुटुंबियांना न्याय द्यावामृतकुटुंबाला आर्थिक मदत करीत सरकारी नोकरीत समाविष्ठ करावे आणि त्याच गावात सर्वांचे पुर्नवसन करण्यात यावेअशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलीदौर्यादरम्यान बसपा चे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळेप्रदेश सचिव राजेंद्र अहिरेरत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रविण मर्चंडे यांच्यासह जिल्ह्याचे पदाधिकारी आणि गावातील लोक उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.