Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ३१, २०२१

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं मोलाचं योगदान |

 लोकशाहीर  अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन


शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या श्रमशक्तीवर जगाचा रहाटगाडा

सुरु असल्याचा क्रांतीकारी विचार अण्णा भाऊ साठे यांनी दिला

-- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्व स्मरण



मुंबई, दि. 31 :- “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कृतीशील साहित्यिक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. आपल्या लेखणी, शाहिरीवाणीच्या बळावर संयुक्त महाराष्ट्राचा, गोवामुक्तीचा लढा यशस्वी करुन दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र सामान्य माणसापर्यंत नेलं. दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांचा वास्तववादी जीवनसंघर्ष साहित्यातून जगासमोर आणला. शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या श्रमशक्तीवरंच या जगाचा रहाटगाडा सुरु असल्याचा क्रांतिकारी विचार त्यांनी दिला. वास्तववादी, काळजाचा ठाव घेणाऱ्या अण्णा भाऊंच्या लेखणीनं, शाहिरीनं महाराष्ट्राचं साहित्यिक, सांस्कृतिक विश्व खऱ्या अर्थानं समृद्ध केलं. कथा, नाटक, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवासवर्णन असे साहित्यातले प्रकार त्यांनी लीलया हाताळले. औपचारिक शिक्षण नसताना, केवळ अक्षरओळख असलेल्या अण्णा भाऊंचं साहित्य आज अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासलं जातं. त्यांच्या नावाने विद्यापीठांमध्ये अध्यासन स्थापन करण्यात आलं आहे. हा अण्णा भाऊंच्या कार्याचा, विचारांचा गौरव आहे. मी अण्णा भाऊंच्या अलौकिक कार्याबद्दल, राष्ट्र व लोकसेवबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. लोकशाहीर अण्णाभाऊंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचं स्मरण करुन विनम्र अभिवादन केले.



पेज नेव्हिगेशन



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.