'गुढीपाडवा' का साजरा केला जातो?
Gudi Padwa Shubh Muhurat 2023 in marathi : हिंदू धर्माचं नवं वर्ष म्हणजे गुढी पाडवा...श्रीखंड पुरी तर कुठे हापूस आंब्याची गोडी...चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला 22 मार्च 2023 ला साजरा करण्यात येणार आहे. तर शुभ मुहूर्त, पूजा विधी, साहित्य आणि गुढी नेमकी कोणत्या दिशेला उभारावीत.
गुढीपाडवा शुभ मुहूर्त
चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा प्रारंभ : रात्री 09.22 पासून (21 मार्च 2023 मंगळवार)
चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा समाप्ती : संध्याकाळी 06.50 पासून (22 मार्च 2023 बुधवार)
उदय तिथी नुसार 22 मार्च 2023 बुधवारला गुढी पाडवा साजरी होणार
गुढी पाडवा पूजा मुहूर्त: सकाळी 06.29 AM ते सकाळी 07.39 AM (22 मार्च 2023)
गुढी उभा करण्यासाठी साहित्य
- वेळूची काठी
- कडुलिंबाचा पानं
- आंब्याची पानं
- दोन तांब्याचे कलश
- काठापदराची साडी
- ब्लाऊज पीस
- साखरेचा हार
- खोबऱ्याचा हार
- लाल कलरचा धागा
- चौरंग किंवा पाठ
- फुलांचा हार
गुढी पूजा साहित्य
- कलश
- हळदी
- कुंकू
- तांदूळ
- पाणी
- पंचामृत
- साखर
- पिवळे चंदन
- अक्षदा
- थोडीशी फुलं
- आरती
- कापूर
- अगरबत्ती किंवा धूप
- लक्ष्मी मातेची नाणी
- सुपारी
- पानं
- सुपारी
गुढी पाडवा पूजा विधी
- वेळूची काठी स्वच्छ धूवा.
- आता त्या काठीवर साडी आणि ब्लाऊज पीस दोरीच्या साह्याने बांधा.
- आंब्याची पानं आणि कडुलिंब बांधा.
- साखरेची माळ आणि फुलांचा हार घाला.
- कलशावर पाच हळदीकुंकाचे बोट लावा.
- शिवाय स्वास्तिक काढा.
- आता हे कलश काठीवर पालथ घाला.
- ही गुढी पाट किंवा चौरंगावर उभी घराच्या मुख्य दाराजवळ उभी करा.
यास्तव पाश्चात्य संस्कृतीनुसार 1 जानेवारीला नव्हे तर गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करण्यात आपले खरे हित आहे. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुध्द प्रतिपदा म्हणजे अर्धा असे साडेतीन मुहूर्त आहेत.शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन गरम पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिध्द करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलासहित बांधतात. कारण लाल रंग शुभदर्शक आहे.
🔹गुढी उभारणेगुढी सूर्योदयानंतर लगेचच उभारायची असते. अपवादात्मक स्थितीमध्ये (उदा. तिथीक्षय) पंचांग पाहून गुढी उभारावी. मोठ्या वेळूच्या (बांबूच्या) उंच टोकास पिवळ्या रंगाचे भरजरी कापड बांधतात. त्यावर साखरेच्या गाठी, कडूलिंबाची कोवळी पाने, आंब्याची डहाळी आणि लाल फुलांचा हार बांधून वर चांदीचा किंवा तांब्याचा कलश यांनी सजवून गुढी उभी केली जाते. गुढी उभे करताना ती मुख्य द्वाराच्या बाहेर परंतु उंबरठ्यालगत उजव्या अंगाला (घरातून पाहिल्यास) भूमीवर उभी करावी.