Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १०, २०२०

भद्रावतीत आंबेडकर वार्ड व तालुक्यातील कुचना गाव सिल




खबरदारी म्हणून प्रशासनाची यशस्वी रंगीत तालीम

भद्रावती (शिरीष उगे)
भद्रावती शहरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पुर्वनियोजन व खबरदारी म्हणून हालचाली तीव्र करण्यात आल्या आहेत. यातच आज (दि.10) ला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी कराव्या लागणा-या ऊपाययोजनांसाठी जिल्हाभरात रंगीत तालीम घेण्यात आल्या. भद्रावती शहरात सकाळपासूनच स्थानिक डॉ. आंबेडकर चौक ते ग्रामोदय संघ पर्यंतचा आंबेडकर वार्ड, भंगाराम वार्ड परीसर दुपारी 3:00 वाजेपर्यंत सिल करण्यात आला. व सोबतच माजरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेला कुचना गाव परीसर देखील सिल केला होता. प्रशासनाने कोरोना विरुध्दच्या लढ्याची यशस्वी रंगीत तालीम या दोनही परीसरात घेतल्या.
तहसील विभाग, पोलीस विभाग, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका विभाग, आशा वर्कर व ईको-प्रो संस्था आदी या परीसरात तळ ठोकून होते.
या परीसरातील घरोघरी जावून विचारपूस केल्या गेली. खोकला, सर्दी, शिन्का, ताप, स्वास घेण्यास त्रास आदी लक्षण येथील रहिवास्यांमधे दिसून येत आहेत काय, किंवा बाहेर ठीकाणाहून येथे कुणी आले आहेत काय, आदी विचारपूस व तपासणी करण्यात आली.
         राज्यात ज्या घटना घडल्या त्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून व पुढील संभाव्य लढाईची रंगीत तालीम म्हणून हे पाऊल प्रशासनाने उचलले होते.
-------------------


संपुर्ण जिल्ह्यामधेच ही मॉक ड्रील करण्यात आलेली आहे. त्याच धरतीवर भद्रावती येथील आंबेडकर वार्ड व तालुक्यातील कुचना येथे सदर मॉक ड्रील घेण्यात आली. एखादा पोझीटीव्ह रुग्ण आढळल्यास कशा प्रकारे कार्यवाही करायची आहे. एरीया सिल करणे, परीसर निर्ज्ंतूक करणे, प्रत्येक कुटुंबांच आशा वर्कर तथा आरोग्य कर्मचारी जावून सर्वेक्षण करणे, समजा काही लक्षण आढळल्यास क्वार्ंटाईन करणे, या प्रकारची ही प्रक्रीया होती. अगदी गोपणीय पध्दतीने सदर मॉक ड्रील कार्यवाही करण्यात आली. वेळेपर्यंत कुणालाच काहीच माहिती नव्हते. निवडक अधिका-यांनाच याची माहिती होती. यशस्विरीत्या सदर मॉक ड्रील पार पडली. यातून नागरीकांनाही माहीती झाली की जर कोरोनाचा रुग्ण आढळल्यास अशाप्रकारे अवस्था होईल, कुणालाच घराबाहेर पडता येणार नाही. याचा प्रत्यय या मॉक ड्रील ने आला. या माध्यमातून असा संदेश आहे की जेव्हढे दिवस लॉक डाउन आहे, तेव्हढे दिवस कुणीही घराबाहेर पडू नये.

 - श्री. महेश शितोडे 
तहसीलदार, भद्रावती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.