Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १०, २०२०

धक्कादायक:नागपुरात 25 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण;नागपूरचा सतरंजीपुरा,मस्कासाथ सील


नागपुर/ललित लांजेवार:
नागपुरात गुरवारी कोरोनाबाधितांचा आकडा 6 ने वाढला आहे.
नागपूर शहरात सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामूळे मृत्यू झालेल्या सतरंजीपुरा येथिल व्यक्तीचे नातेवाईक आणि संपर्कातील हे 6 जण आहेत.

 या सहा कोरोना पाॅझिटिव्ह रुगांचे वय अनुक्रमे  8,12,21, 30, 34, 35,आहे.नागरिकांच्या बेजबाबदारणामुळे नागपुरात (सामाजिक संसर्ग) चा धोका वाढत आहे. नागपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या 25 झाली आहे, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपूर शहरात आहेत. 
नागपूरचा सतरंजीपुरा/मटकासाथ सील 
सतरंजीपुरा येथिल  व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील 6 लोक कोरोंना पॉझिटिव्ह सापडले आहे. त्यानंतर पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. आणि त्या 6 लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी आरोगी विभाग करत आहे.  

विदर्भात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या 72 झाली आहे.. यात नागपूर 25(एक मृत्यू), बुलडाणा 17(एक मृत्यू), यवतमाळ 11, अकोला 13, अमरावती 4(एक मृत्यू), गोंदिया 1, वाशीम 1 चा समावेश आहे.
photo:M.times

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.