Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०९, २०२०

हनुमान जयंती उत्सवाला होणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भेट


कारंजा/घाडगे:उमेश तिवारी:
करोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये गरजू व्यक्‍ती व कुटुंबांना मदत करण्यासाठी श्री. संत विनायक उर्फ लटारे महाराज संस्थान, कारंजा(घाडगे) जि. वर्धा यांनी अडचणीत आलेल्या आपल्या महाराष्ट्राला व आपल्या बांधवानां शासनामार्फत सहकार्य व्हावे या उदात्त हेतूने खारीचा वाटा म्हणून "हनुमान जयंती उत्सव मध्ये होणारा खर्च वाचलेला असतांना मुख्यमंत्री सहायता निधी ला 21,111 रु. (एकवीस हजार एकशे अकरा ) चा धनादेश  दिला.

मा. सचिनजी कुमावत, तहसीलदार, कारंजा यांना सुपूर्त केला.यामुळे धार्मिक संस्थान यांची सामाजिक कार्यात सुद्धा बांधिलकी असल्याचे एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले. धनादेश सुपूर्द करतांना संस्थानचे अध्यक्ष विनोदजी वलगावकर व उपाध्यक्ष रामभाऊ प्रांजळें उपस्थित होते.

सदर कार्या करिता संस्थांनचे सचिव प्रल्हादभाऊ मोटवानी, कोषाध्यक्ष बकुलभाऊ जसाणी, संचालक जनार्धनजी चाफले, संजयजी कदम, अंकुशजी दर्यापूरकर, अनिल जैस्वाल, आजीवन सदस्य शिवनारायण अग्रवाल व गिरीधर अग्रवाल यांना विचारणा केली असता त्यांनी तात्काळ सहमती दर्शविली सदर कार्याची तहसीलदार कारंजा यांनी प्रशंसा केली. 

अशाचप्रकारे सर्व धार्मिक संस्थानने हनुमान जयंती अशा पद्धतीने साजरी करून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री. संत विनायक उर्फ लटारे महाराज संस्थान, कारंजा(घाडगे) जि. वर्धा यांचे वतीने करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.