कौतुकास्पद! नॅशनल टेलिव्हिजन फॅशन शो 2022 मध्ये गडचिरोलीच्या कलाकारांनी मारली बाजी
गडचिरोली ः १ फेब्रुवारी २०२२ रोजी मंगळवारला पुणे येथे ग्रोथ प्रॉडक्शनच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये गडचिरोलीच्या कलाकारांनी सहभाग नोंदवला व जिल्ह्याचे नाव उंचावले. रनवे वॉक टायटल ऑफ इंडिया नॅशनल टेलिव्हीजन फॅशन शो २०२२ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. यासाठी आधी ऑडिशन घेण्यात आल्या होत्या, या ऑडीशनमध्ये गडचिरोलीच्या कलाकारांनी आपले टॅलेन्ट सादर केले व रनर अप बक्षीसे जिंकली. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे एकूण नऊ कलाकार सहभागी झाले होते.
सौ.च्या कॅटेगिरीत मनिषाजगदीश मडावी, किशोरवयीन- आर्य नरेश बिडकर, मिस- कृष्णा वासुदेव तडसे, मिस - यशश्री विनोद वंजारी, किशोर - अनुष्का नरेश बिडकर, लहान मुले काव्या खुमेंद्र मेश्राम, लहान मुले आरुष उत्तमराव मेहरे. तर श्री.सिद्धेश खुशाल मुनघाटे.हे सर्व कलाकारांचे १ फेब्रुवारीला जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर जिल्ह्यातील काही सामाजिक संस्थांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. टायगर ग्रुप गडचिरोली, आदिवासी नारी शक्ती, चातगाव ग्रामपंचायत पदाधिकारी, आदिवासी कार्यकर्ते यांनी ढोल ताशाच्या गजरात, फटाक्याच्या अतिशबाजी, पुष्यगुच्छ देऊन त्यांचे हर्षोल्हासात स्वागत करत शुभेच्छा दिल्या.सोबतच गडचिरोली वासीय जनतेने देखील त्यांचे कौतूक केले व त्यांना शुभेच्छा दिल्यात.
यावेळी संविधान व मानव हक्क समितीचे विभागीय अध्यक्ष मा. डॉ खोब्रागडे सर, टायगर ग्रुप चे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी श्री मा.गोपालजी उईके सरपंच तथा सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत चातगाव. आदिवासी नारीशक्ती चे अध्यक्षा मा.जयश्री येरमे,मा लक्ष्मी कन्नाके, व इतर पदाधिकारी, स्पर्धेकांचे सर्व आप्तवाइक आणि मित्रपरिवार बहुसंख्येने गडचिरोली वासीय उपस्थित होते.