Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०९, २०२०

मेंढपाळ कुटुंबाना धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत



निफन्द्रा (प्रतिनिधी)
शेळ्या मेंढ्या घेऊन गावोगावी भटकंती करीत शेतशिवारात, जंगलात राहून आपला उदरनिर्वाह करणारा धनगर समाज लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडला त्यांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडील धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत बिराडावर जाऊन पोहचण्याचे काम करण्यात येत आहे.
सावली तालुक्यात बाहेर तालुक्यातील शेळ्या मेंढ्या पाळून पारंपरिक व्यवसाय करणारे धनगर समाज शेतशिवारात व जंगल परिसरात आहेत. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये आभाळाच्या छत्रछायेखाली राहून आपला पारंपारिक व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात, काही ठिकाणी तर महिला मुलांबाळासह असतात. अडचणीत असूनही कोणतीही शासकीय मदतीशिवाय आपला प्रपंच चालवीत असतात मात्र कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यामुळे रसद पुरविण्याचे मार्ग बंद झाले आहे. ही बाब समाजाचे कार्यकर्ते असलेले पंचायत समिती सभापती विजय कोरेवार व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ तुषार मर्लावार यांचे लक्षात येताच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडील मदत मेंढपाळ कुटुंबाना बिराडावर जाऊन पोहचविण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.