Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०९, २०२०

झोपडपट्टीतील महिला बचतगटांनी बनवले मास्क; यूट्यूब वरून स्वतः शिकलेत




मुख्याधिकारी जूही अर्शिया यांचे मार्गदर्शन..

राजूरा ..(चंद्रपूर) /आनंद चलाख
देशभरात कोरोणामुळे दहशत पसरलेली आहे. देश एकवीस दिवस लाकडाऊन आहे. प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी लागलेली आहे. आंतर जिल्हा व आंतर राज्याच्या सीमा असेल करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन धडपडत आहे.मास्कचा अनेक ठिकाणी तुटवडा जाणवत आहे. अशा स्थितीत नागरिक, प्रशासनातील कर्मचारी, सफाई कामगारांना मास्क उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेतलेला आहे. नगरपरिषद अंतर्गत महिला बचत गटातील महिलांना घरबसल्या युट्युब वरून मास्क बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. लाकडाऊन स्थितीतही शहरातील झोपडपट्टी भागातील सोनिया नगर येथील बचत गटातील महिला मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद राजुरा अंतर्गत श्रद्धा वस्ती स्तर संस्था सोनिया नगर राजुरा येथील बचत गटातील महिला मास्क बनविण्यासाठी अतिशय विपरीत परिस्थितीत काम करीत आहेत.
लॉकडाऊन नंतर राजुरा नगरपरिषदेने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली. शहरातील शासकीय कार्यालये, बँक ऑफिस, बस स्टॉप , भाजीपाला मार्केट शेड तसेच शहरातील प्रत्येक वार्डात निर्जंतुकीकरण मोहीम राबविली. सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने दैनिक भाजीपाला मार्केट स्थलांतरण आठवडी बाजार बंद करण्यात आला. बाहेरून आलेल्या विद्यार्थी व नागरिकांचे होम कोरेनटाईन करण्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करुन देण्यात आली. सुरक्षेच्यादृष्टीने सर्व सफाई कामगारांना व इतर कार्यालयातील कर्मचारी यांना मास्क देण्यासाठी स्थानिक महिला बचत गटांना काम देण्यात आले. सोनिया नगर येथील बचत गटातील महिला मागील पाच दिवसापासून मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेले आहेत. कुठल्याही प्रशिक्षणा शिवाय नगराध्यक्ष अरुण धोटे यांचे प्रोत्साहन व मुख्याधिकारी जुही अर्शिया यांच्या मार्गदर्शनाखाली युट्युब वरून मास्क बनविण्याचे कौशल्य प्राप्त केले. समन्वय सुरेखा पटेल यांच्या माध्यमातून महिला बचत गट समूहातील व नुकतेच पाचशे मास्क बनवून नगरपरिषदेकडे सुपूर्द केलेत. अतिशय कठीण परिस्थितीत सोनिया नगर येथील महिलांनी पुढाकार घेऊन मास्क तयार करण्याच्या कामात गुंतलेले आहेत. आणखी पाचशे मास्क नगरपरिषदेला देणे आहे.
शहरातील सोनिया नगर येथील झोपडपट्टीतील महिला बचत गटातील सदस्य घेतलेला पुढाकार हा निश्चितच कौतुकास्पद आहे. 500 मास्क तयार करून नगर परिषदने पुरवठा केलेला आहे. पुन्हा पाचशे मास्क बनवण्याचे काम बचत गटाला मिळालेले आहे. त्यामुळे बचत गटातील महिला हिरारीने काम करीत आहेत. यात समन्वक सुरेखा पटेल यांचे मोलाचे सहकार्य बचत गटातील महिलांना मिळत आहे. शहरातील सफाई कामगार इतर कर्मचारी व नागरिकांना ही मास्क उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे.




लाकडाऊन स्थितीमध्ये नगरपरिषदेतील सफाई कामगार व इतर कर्मचाऱ्यांना मास्क पुरवण्यासाठी सोनिया नगर येथील बचत गटाला काम देण्यात आले. मात्र संचारबंदीमुळे मार्गदर्शन कसे करावे हे समजत नव्हते.त्यामुळे युट्युब वरून त्यांना मास्क बनविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. गटातील महिलांनी अतिशय चांगल्या दर्जाचे कॉटनचे मास्क तयार केलेले आहेत. गरजेनुसार नागरिकांसाठीही उपलब्ध करून देता येईल.
- जूही अर्शिया
मुख्याधिकारी नगरपरिषद ,राजुरा

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.