नागपूर/विशेष प्रतिनिधी:
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवरांनी कॉंग्रेसला खा.बाळू धानोरकरांच्या मार्फत अख्या महाराष्ट्रात निवडून आणले शेवट परियंत त्याच जागेवर कॉंग्रेसचे घोड अडकले असतांना स्थानिक विरोधकांना हायर करत व आपले शक्ती प्रदर्शन करत महाराष्ट्रात कॉंग्रेसला चंद्रपूरच्या नावाने लाज राखता आली.विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपद(विशेष सुरक्षा व मंत्रीपद दर्जा) असलेल्या विजय वडेट्टीवारांन सारख्या वजनदार नेत्याला मात्र महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीच्या सरकारने नाराज करत हलके फुलके खाते दिले.
आयुष्यभर पक्षात तन मन धनाने छातीला माती लावून काम करा अन काम झाल कि "काय करू तुझ काम झाल माझ" असे म्हणत बाजूला सारून देन म्हणजे पक्ष श्रेष्ठीचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करणे होय.विजय वडेट्टीवारांना दिल्लीतील बैठकीतही त्यांना पक्षाने बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली होती. यामुळे त्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागेल, हे नक्की होते. वडेट्टीवार यांचा पक्षश्रेष्ठीवर तितकाच विश्वास देखील होता. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देतानाच चांगले खाते मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, खातेवाटपात त्यांना चांगले खाते न मिळाल्याने ते नाराज आहेत. आणि साहजिकच असणार देखील.
विजय वडेट्टीवार हे चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आलेत. १९९६-९८ मध्ये युतीचे सरकार असताना ते वनविकास महामंडळाचे अध्यक्ष होते.
२००४-०९ या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर २००४-०९ या काळात त्यांनी कॉंग्रेसतर्फे चिमूरची निवडणूक लढवून विजय संपादन केला. याच काळात त्यांना राज्यात ऊर्जा, सिंचन, आदिवासी कल्याण, पर्यावरण व वन राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर त्यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये त्यांच्याकडे सिंचन, ऊर्जा, वित्त व नियोजन, संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम केले. विशेष म्हणजे, मोदी लाटेतही ते २०१४ मध्ये चिमूरऐवजी ब्रम्हपुरी या शेजारच्या मतदारसंघातून निवडणूक लढून विजयी झालेत. त्यामुळे त्यांचे पक्षात वजन वाढले होते.यंदाही भाजपने ब्रम्हपुरी सारख्या ठिकाणी पूर्ण ताकद लावली मात्र विजयचाच विजय झाला.
उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीला कॅबिनेट मंत्री म्हणून वडेट्टीवार यांनी दांडी मारली आणि नाराजीचे प्रत्यक्ष संकेत पक्षश्रेष्ठींना दिले.वडेट्टीवार यांच्याकडे ओबीसी, खार जमीन विकास आणि भूपंक पुनवर्सन खाते देण्यात आले आहेत. या खात्यांचे स्वतंत्र असा दर्जा नाही. ही खाती अन्य खात्याशी जोडल्या गेली आहेत. त्यामुळे अनुभवी माजी मंत्री असलेल्या नेत्याला अश्या प्रकारची निराशा दाखवणारी खाती देणे म्हणजे वडेट्टीवारांवर अन्यायाच !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत.अश्यातच वडेट्टीवार यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. जे भाजप सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होते.
दरम्यान काँग्रेसच्या कठीण प्रसंगात वडेट्टीवार यांनी विदर्भात व महाराष्ट्रात काँग्रेसला बळ दिले. विरोधी पक्षनेता असल्यामुळे त्यांना महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रीपद मिळण्याची त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना व चंद्रपूरकरांना अपेक्षा होती. परंतु त्यांना इतर मागास प्रवर्ग शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग कल्याण आणि भूकंप पुनर्वसन अशी खाती देण्यात आली. कमीत कमी पक्ष श्रेष्ठीनी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या मेहनतीचे बक्षीस म्हणून चांगले खाते देऊ शकले असते,मात्र तसे काहीही झाले नाही.
तर कधीही राजकारणात मंत्रीपदाचा अनुभव नसतांना आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद देत मुंबई उपनगर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली, अन त्याच महाआघाडीने वडेट्टीवार यांच्या सारख्या वजनदार माणसाचा विचार न करणे म्हणजे वडेट्टीवाराना अपमान जनक वागणूक देणे होय.
मात्र विजय वडेट्टीवार यांच्यासोबत असे का केले जात आहे तर पक्षांतर्गत गटबाजी असे याचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर विदर्भात कॉंग्रेसची ताकद वाढू लागली असतांना वडेट्टीवारावर अन्याय म्हणजे परत विरोधकांना रान मोकडेे करून देणेच होय.वडेट्टीवार यांच्या या नाराजीने भाजप त्यांना विश्वासात घेत असून भाजपात पुनर्वसन करण्यास आम्ही तयार आहोत. त्यामुळे फिजिकली कॉंग्रेसमध्ये असणारे व मेंटली मंत्रीपदावरून नाराज असणारे वडेट्टीवार भूकंप तर घडवून आणणार नाही ना? याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.