Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ०९, २०२०

बेलदार, कापेवार व तत्सम समाजाचे 19ला अधिवेशन

 

उप वधू- वर परिचय मेळाव्याचे अहेरी येथे आयोजन

चंद्रपूर दि.09जानेवारी
युवा विदर्भ बेलदार समाज बहुउद्देशीय मंडळ चंद्रपूर.जिल्हा  शाखा गडचिरोली व शाखा अहेरी तालुका चे विद्यमाने आयोजित 17 वे राज्यस्तरीय अधिवेशन तथा उप वधू वर परिचय मेळाव्याचे दि.19 जानेवारी 2020 रोज रविवार ला स्थानिक इंडियन पॅलेस हॉल अहेरी,  तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली इथे सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 वाजे पर्यंत एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मान.आमदार श्री  बाबा आत्राम माजी राज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य व श्री. वामनराव कासावार माजी आमदार वणी जिल्हा यवतमाळ यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे सर्वश्री चंद्रशेखर कोटेवार प्रांतीय अध्यक्ष, युवा विदर्भ बेलदार समाज बहुउद्देशीय संघटना चंद्रपूर,भाग्यश्री आत्राम. हळगेकर बांधकाम सभापती जिल्हा परिषद गडचिरोली,
सौ.शहीन जाहीर हकीम,अहेरी,श्री. केशवराव कात्रटवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली,
 श्रीहरी भंडारी उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक गडचिरोली, सौ सरिता सुधाकर पेद्दी,सौ प्राजक्ता पेद्दपेलिवार,अमोल मुक्कावार, सौ. वनिता पेद्दापेलिवार सिरोंचा,सौ. प्रभाताई चिलके सामाजिक कार्यकर्ते चंद्रपूर,सौ.राधिका तडकलवार सीरोंचा,श्री,रवींद्र राल्लाबंडीवार सिरोचा, व किष्ट्य्याजी उपलपवार सेवानिवृत्त शिक्षक इत्यादींचे सार्वजनिक व राजकिय नेत्यांचे प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत समाज प्रबोधन अधिवेशन व राज्यभरातील उप वधु- वर परिचय मेळावा संपन्न होणार आहे. तेंव्हा सदर कार्यक्रमात बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित राहून कार्यक्रमाचे लाभ घेऊन आम्हाला उपकृत करावे . असे युवा विदर्भ बेलदार समाज संघटनेचे प्रांतीय कार्यकारिणी, गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी अहेरी तालुकयातील कार्यकारणी सह चंद्रशेखर कोटेवार, रवींद्र बँड्डीवार, आनंदराव अंगलवार, प्रा. राजेश कट्रतवार, प्रकाश शनखदारवार, अरविंद गांगुलवार,
प्रमोद एडलावर, मनीष कन्नमवार, अविनाश अंकलवार, आनंद कार्लेकर व जिल्हा गडचिरोली,अहेरी तालुकयातील समस्त पदाधिकारी एका पत्रकान्वये प्रसिध्द करीत आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.