Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी ०८, २०२०

ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेचा ठराव विधानसभेत मंजूर

डॉ.ऍड.अंजली साळवे विटणकर यांच्या प्रयत्नांना यश
नागपूर/प्रतिनिधी:

जनगणना 2021 मध्ये ओबीसींची स्वतंत्र जातिनिहाय स्वतंत्र जनगणना करण्यासाठी विधीमंडळात ठराव मंजूर करून हा विषय केंद्र शासनाकडे रेटून धरण्याच्या विनंतीचे निवेदन "पाटी लावा" आंदोलनाच्या संयोजक डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ना. एकनाथ शिंदे, ना. छगन भुजबळ, ना. बाळासाहेब थोरात, ना. विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रणिती शिंदे, बच्चु कडू, रोहीत पवार, किशोर जोरगेवार तसेच अनेक विधिमंडळ सदस्यांना दिले होते. 


ओबीसीची स्वतंत्र जनगणना डावलल्याने घरांवर 
जनगणना 2021 मध्ये सहभाग नाही’च्या पाट्या
व याचा सातत्त्याने पाठपुरावाही केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. देशाच्या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी शिफ़ारस केंद्र सरकारला करणारा ठराव विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला आणि तो एकमताने मंजूरही करुन घेतला आहे.



2021 मध्ये होणा-या जनग़ननेच्या नमुना अर्जात ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम नसणे हा ओबीसींच्या संविधानिक अधिकाराची गळचेपी असून याविरोधात डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांनी पुढाकार घेत उच्च न्यायालयात (नागपूर खंडपीठ) मध्यस्थी अर्ज दाखल करून जनगणना 2021 ला आव्हान दिले आहे. याशिवाय ‘जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही, अशी "पाटी लावा" मोहीम डॉ ऍड साळवे यांनी सुरू केली आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ गोंदीया, वर्धा या जिल्ह्यात ‘पाटी लावा’ मोहीमेने लोकचळवळीचे रुप धारण केले आहे. राज्य शासनानेही हा विषय केंद्राकडॅ रेटून लावण्याची मागणी डॉ ऍड अंजली साळवे यांनी राज्यातील सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींना केली होती.

आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनीही लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मांडून संपुर्ण देशाचे लक्ष या ज्वलंत विषयाकडे वळविल्याची माहिती डॉ साळवे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, नामदार एकनाथ शिंदे, नामदार छगन भुजबळ, नामदार बाळासाहेब थोरात यांचेसह आमदार विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, बच्चु कडू, रोहीत पवार, किशोर जोरगेवार यांचेशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली होती.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.