विविध क्रीडा प्रकारात सुमारे 1,064 कर्मचारी सहभागी होणार
नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक 17 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान नागपूर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या राज्यातील सर्व १६ परिमंडलातील सुमारे 1 हजार 64 अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात ३७६ महिला तर ६८८ पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या निर्देशनानुसार सर्वसाधारण विजेतेपद निश्चित करताना या वर्षी प्रथमच महिला खेळाडुंच्याही वैयक्तिक आणि सांघिक गुणांची नोंद घेतली जाणार आहे.
महावितरण मधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी दरवर्षी आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. 2019-20 यावर्षाकरिता या स्पर्धेचे यजमानपद नागपूर परिमंडलाकडे आहे.स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2020 ला सकाळी नऊ वाजता रवी नगर येथिल नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मैदानावर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक (संचालन) श्री दिनेशचन्द्र साबू राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, संचालक (वित्त) श्री.जयकुमार श्रीनिवासन, संचालक (वाणिज्य) श्री. सतीश चव्हाण, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर श्री. पवनकुमार गंजू उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. 19 जानेवारी 2020 ला दुपारी 4 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्याच मैदानावर राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितीन राऊत यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री दिलीप घुगल राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (संचालन) श्री दिनेशचन्द्र साबू, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, संचालक (वित्त) श्री जयकुमार श्रीनिवासन, संचालक (वाणिज्य) श्री. सतीश चव्हाण, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर श्री.पवनकुमार गंजू,औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री राहुल रेखावार उपस्थित राहणार आहेत. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक श्री. दत्ता शिंदे, कार्यकारी संचालक (वितरण-4) श्री चंद्रशेखर येरमे, कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) श्री प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक (माहिती व तंत्रज्ञान आणि देयके व महसूल) श्री योगेश गडकरी, कार्यकारी संचालक (वितरण) श्री अरविंद भादीकर, कार्यकारी संचालक (लेखा व वित्त) श्रीमती स्वाती व्यवहारे, कोकण परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री.अंकुश नाळे, पुणे परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री सुनील पावडे, स्पर्धेचे मुख्य
समन्व्यक मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री.संजय ढोके इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत खो-खो, ॲथलेटिक्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि ब्रिज या खेळांचा समावेश आहे. वैयक्तिक, सांघिक आणि सर्वसाधारण या तिनही प्रकारात एकूण ३६ पारितोषिके विजेत्यांना दिली जाणार आहेत. तसेच जे खेळाडू या वर्षी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचाही या वेळी गौरव करण्यात येणार आहे.
नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक श्री दिलीप घुगल यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते,कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि आयोजन समितीचे सचिव तथा नागपूर परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री मधुसुदन मराठे परिश्रम घेत आहेत.