चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांना वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर समोर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत आदिवासी भागात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करावी, सण 2017 नंतर पात्र झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करावी, पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी, प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक यांना निवड श्रेणी लागू करावी, 6 वे व 7 वे वेतन आयोगाच्या सेवापुस्तक पडताळणी करावी न केल्यास पुढे कोणतीही वसुली करू नये, वैद्यकीय प्रतिपूर्ती व जिपीएफ कर्ज मंजुरी साठी कालमर्यादा निश्चित करणे व टोकन पद्धती लागू करणे, 2014 च्या बिएससी पदविधर नियुक्त शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करणे, डीसीपीएस कपातीच्या पूर्ण हिशोबासह पावत्या देणे, प्राथमिक शिक्षकांच्या मागे लागलेली व त्यांचे अध्यापनाचे दिवस कमी करणारी प्रशिक्षणे बंद करणे, विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबवणे, तालुका व जिल्हा स्तर शिक्षक समायोजन करणे. या व अन्य मागण्यांना घेऊन सदर आंदोलन होणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चंद्रपूर च्या वतीने विजय भोगेकर, हरीश ससनकर, अल्का ठाकरे, चंदा खांडरे, नारायण कांबळे, रवी सोयाम, निखिल तांबोळी, लोमेश येलमुले, अनंता रासेकर, दिलीप इटनकर, किशोर आनंदवार, सुनील कोहपरे, मोरेश्वर बोन्डे, सुनीता इटनकर, माधुरी निंबाळकर, विद्या खटी, सुलक्षणा क्षीरसागर व अन्य जिल्हा, तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.