Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे २७, २०१९

बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीच्या (HSC) निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. १२वीचा निकाल उद्या २८ मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC)चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा असल्याने अधिकाधिक मुलांचा सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे.
येथे पाहा निकाल

mahresults.nic.in,

maharashtraeducation.com, results.mkcl.org,

mahahsscboard.maharashtra.gov.in,

mahahsscboard.in
असा पाहा निकाल –

वरीलपैकी एका संकेतस्थळावर जा
संकेतस्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
बैठक क्रमांक टाका
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.