नागपूर/प्रतिनिधी:
लोकसभा निवडणुकित भाजप सेना युतीने विदर्भातील सर्वच्या सर्व 10 जागा जिंकून निर्विवादित यश मिळविले होते. परंतु या निवडणुकीत युतीला अमरावती व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. ही बाब भाजपसाठी धक्कादायक होती.अहिर यांच्या पराभवानंतर त्यांचे मंत्रीपद जाणार, अशी चर्चा होती. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या चर्चेला पूर्णविराम देत अहिर यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे नवीन मंत्रीमंडळात हंसराज अहिर यांचा समावेश असणार आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना 514744 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांना 559507 मते मिळाली आहेत.एकूण झालेल्या मतदानामध्ये अहीर यांना 41.56 तर सुरेश धामोरकर यांना 45.18 टक्के मते मिळाली आहेत. सुरूवातीपासून दोन्ही उमेदवारांमध्ये चुरूस सुरू होती. गुरूवारी रात्री उशीरा अहीर यांचा पराभव जाहीर करण्यात आला. लोकसभेच्या निकालात सर्वत्र भाजपच दिसत असताना चंद्रपुरात मात्र एका मंत्र्याला पराभव पत्करावा लागला, हि बाब भाजपसाठी धक्कादायक होती.अहिरांच्या पराभवानंतर सध्या चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार वगळता कोणताच मोठा नेता नाही,त्यामुळे भाजपला अहिर यांना कुठेतरी फ़िक्स करावे लागणार आहे.त्यामुळे आता अहिरांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे.मात्र यासाठी आणखी किती कालावधी लागतो हे मात्र कोणीच ठासून सांगू शकत नाहीत.