अनिकेत मेश्राम/महादुला/कोराडी:
सुरादेवी मार्गे कोराडी महाजेनको येथे कोळसा वाहतुक करणारा एक ओवरलोडेड टिप्पर सलीम चिकन सेंटरच्या समोर आज सोमवारी सकाळी 7:30 च्या सुमारास रस्त्याच्या दुतर्फा लावलेली लोखंडी रेलिंग तोडुन पलटल्याने चांभार व्यक्तीचा जागीच दबुन म्रृत्यु झाला.
प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार टिप्पर ची गती फार कमी होती परंतु टिप्पर मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बहुतेक ओवरलोडेड टिप्पर रेलिंग तोडुन सर्विस रोडवर उलटला. सकाळी चप्पल जुता शिवन्याचे काम करणाऱ्या म्रृतक सोनेरीलाल सोनेकर रा. महादुला या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
म्रृतक जेमतेम आपले दुकान लावत होता. त्याच्या काही ध्यानीमनी न येताच त्याच्या अंगावर ओवरलोडेड कोळशाचा टिप्पर पलटल्याने त्याच्या दुःखद निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.टिप्पर चा चालक केबिन मध्ये फसला होता त्याला कैबिन च्या समोरच्या काचा फोडून लोकांनी बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र बातमी लिहीपर्यंत म्रृतकाला बाहेर काढले नव्हते त्यामुळे शेकडो नागरिकांनी खूप गर्दी जमा झाली होती.
अपघात झालेल्या टिप्पर चा क्रमांक MH-04 DS-7643 असुन हा ट्रक चंद्रा कोल कंपनीचा असु शकतो असे प्रत्यक्षदर्शी चे म्हणणे आहे तसेच या कंपनीला महाजेनको कडे कोळसा सप्लाय चा ठेका मिळाला आहे.
काल रविवार चा बाजार होता परंतु काल अशी घटना जर घडली असती तर जास्तीत जास्त लोक या अपघातात दगावली असती हे विशेष. ट्रक मध्ये असलेल्या कोळशाच्या क्वालिटी वरुन ही एक गोष्ट लक्षात येते कि हा अत्यंत निक्रृष्ठ दर्जाचा व दगडी कोळसा आहे व अशा निक्रृष्ठ कोळशामुळे महाजेनको मधील वीज उत्पादनावर गंभीर परिणाम होतो.अशा कंपनीला ब्लैकलिस्टेड करावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. तसेच दाट वस्ती असलेल्या महादुला शहरातुन अशा ओवरलोडेड कोळसा वाहतुक महाजेनको ने थांबवावी व म्रृतकाच्या परिवाराला अतितातकाळ आर्थिक मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री सुनीलभाऊ साळवे यांनी केली आहे.