आत्महत्या नसून हि हत्या आहे असा माहेरच्या जनतेचे
व नातेवाईकांचे संशयास्पद आरोप
चिमूर/रोहित रामटेके:
चिमूर पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या बोडधा (हेटी) येथे राहत्या घरी २४ वर्षीय पूनम अमोल बरसागडे या महिलेनी दिनांक.२१/०५/२०१९ ला दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली.या नंतर मृतक महिलेच्या पती ने तसेच सासरच्या लोकांनी मिळून जांभुळघाट येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात शव नेण्यात आले.व डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले नंतर त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन गृह नसल्याने चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालयात मृतक महिलेचा शव आनण्यात आला या महिलेच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा असल्याने हि हत्या आहे. असे बोलल्या जात आहे.
परंतु माहेरच्या जनतेचे व मृतक महिलेच्या नातेवाहिकांनी सांगितलेल्या माहितीवरून गेल्या अनेक दिवसांपासून ५ ते ६ वेळा पती व जाऊ यांनी मिळून पत्नी पूनम बारसागळे या मृतक महिलेला मारहाण केल्या गेली होती व या प्रकरणी स्थानिक गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडे अनेकदा तक्रारी सुद्धा करण्यात आल्या असतांना तंटामुक्ती अध्यक्ष यांनी आपसी समजूत घालवून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.व यानंतर असा प्रकार यानंतर घडणार नाही अशी समजूत माहेरच्या नातेवाहिकांना देण्यात आली होती.व हा वाद त्यानंतर असाच कायम राहिला असून पूनम बारसागडे या मृतक महिलेला जबर मारहाण करून त्या महिलेचा खून केल्या गेलेला आहे असा आरोप मृतक महिलेच्या नातेवाहिकांच्या कडून केल्या जात आहे.
जोपर्यंत आरोपीला अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत या चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालयातील शव विच्छेदन गृहातून आम्ही शव हलविणार नाही असे मत मृतक महिलेच्या नातेवाहिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.पुढिल तपास भिसी पोलिस स्टेशन करीत आहे.