Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

चिमूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिमूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, एप्रिल ०७, २०२१

 विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा : यश दत्तात्रय

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा : यश दत्तात्रय



राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल जाहीर करा 

विद्यार्थी काँग्रेस चे राज्यपालांना निवेदन 

चंद्रपूर : जिल्ह्यातील नव्हे तर एकेकाळी विदर्भातील एकमेव नावाजलेले राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय होते. कालांतराने गोंडवाना विद्यापीठ स्थापन झाल्यापासून गडचिरोली व चंद्रपूर येथील शिक्षण व्यवस्थेचे बारा वाजल्याचे दिसून येत आहे. या महाविद्यालयातील ३५० विद्यार्थ्यंचे निकाल विद्यापीठाने प्रलंबित ठेवले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नोकरी मागायची कशी असा प्रश्न पडला आहे. या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यपालांनी हस्तपसेप करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यश दत्तात्रय यांनी केली आहे. 

                अभियांत्रिकी शाखेत चंद्रपूर येथील राजीव गांधी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील गोंडवाना विद्यापीठातील हि शेवटची तुकडी आहे. यात जवळपास ३५० विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे या सर्व विध्यार्थ्यानी परीक्षा शुल्क व इतर सर्व महाविद्यालीन प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. परीक्षा देखील या विध्यार्थ्यानी दिल्या आहेत. परंतु विद्यापीठाने अद्याप निकाल प्रलंबित ठेवलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अद्याप अंधारात असल्याचे चित्र आहे. यातील अनेक विद्यार्थी हे गरीब परिवारातील आहेत. त्यांना हे पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोध घेणे गरजेचे होते. परंतु आता नोकरी मागायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. 
            
                      हा गोंडवाना विद्यापीठांच्या चुकीने प्रश्न निर्माण झालेला आहे. निकाल रोखण्यामागे जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात कामा नये. हा गंभीर प्रश्न असून यात स्वतः राज्यपाल महोदयांनी लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती निवेदनाच्या माध्यमातून काल मंगलवारला विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी केली आहे.  

बुधवार, जून १२, २०१९

कोटगाव परिसरात ढोऱ्या वाघाची दहशत

कोटगाव परिसरात ढोऱ्या वाघाची दहशत

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
चिमूर/रोहित रामटेके:

चिमूर तालुक्यातील कोटगाव परिसरात चार दिवसांपासून मोठ्या वाघाची दहशत सुरु आहे. चार दिवसामध्ये सहा वाघाचे दर्शन गावातील नागरिकांनी प्रत्येक्षरीत्या केले आहे. 
हे वाघ अनेक दिवसापासून दळी मारून बसले आहेत असे वाघ पाहणाऱ्या नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. अनेक दिवसांपासून दळी मारलेल्या वाघाने आज सकाळच्या सुमारास दर्शन दिले, व दुपार वेळात आपले भक्ष एका बकऱ्याला केले व वाघांची संख्या जास्त असल्यामुळे बकऱ्याची हद्दी सुद्धा दिसू दिली नाही. हि बाब गावकऱ्यांना माहित होताच घटनास्थळी लोकांची गर्दी भयानक प्रमाणात दाटली होती.तीन वाघ असल्यामुळे कोटगाव गावातील जनतेमध्ये अतीच प्रमाणात भीतिचे वातावरण दाटले आहे.

गावकऱ्यांची मागणी याप्रमानात आहे की, गावातील वाघाचे विल्हेवाट वनविभागाने तात्काळ लावणे,असे गावातील नागरिकांची महत्वाची मागणी आहे. गावातील सर्व भाग हा नद्यांनाल्यानी व्यापलेला आहे. तरी सुद्धा हि पहिलीच घटना या परिसरात आढळली आहे. कोटगाव गावातील लोकांना नेहमी दळणवळणासाठी जांभुळघाट येथे जावे लागत असते. व ज्या नद्यांच्या भागात वाघ दळून बसला आहे त्या ठिकाणचे शेतकऱ्यांना आपल्या शेतात रात्रौ बे रात्रौ यावे लागत असते या सर्व गोष्टीचे लक्ष ठेऊन प्रत्येक्ष वनविभागाने कार्य करावे अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे.

बुधवार, मे २२, २०१९

 घरगुती वादातून २४ वर्षीय विवाहित महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या

घरगुती वादातून २४ वर्षीय विवाहित महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या नसून हि हत्या आहे असा माहेरच्या जनतेचे
 व नातेवाईकांचे संशयास्पद आरोप
चिमूर/रोहित रामटेके:


चिमूर पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या बोडधा (हेटी) येथे राहत्या घरी २४ वर्षीय पूनम अमोल बरसागडे या महिलेनी दिनांक.२१/०५/२०१९ ला दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली.या नंतर मृतक महिलेच्या पती ने तसेच सासरच्या लोकांनी मिळून जांभुळघाट येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात शव नेण्यात आले.व डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले नंतर त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन गृह नसल्याने चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालयात मृतक महिलेचा शव आनण्यात आला या महिलेच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा असल्याने हि हत्या आहे.  असे बोलल्या जात आहे.

 परंतु माहेरच्या जनतेचे व मृतक महिलेच्या नातेवाहिकांनी सांगितलेल्या माहितीवरून गेल्या अनेक दिवसांपासून ५ ते ६ वेळा पती व जाऊ यांनी मिळून पत्नी पूनम बारसागळे या मृतक महिलेला मारहाण केल्या गेली होती व या प्रकरणी स्थानिक गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडे अनेकदा तक्रारी सुद्धा करण्यात आल्या असतांना तंटामुक्ती अध्यक्ष यांनी आपसी समजूत घालवून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.व यानंतर असा प्रकार यानंतर घडणार नाही अशी समजूत माहेरच्या नातेवाहिकांना देण्यात आली होती.व हा वाद त्यानंतर असाच कायम राहिला असून पूनम बारसागडे या मृतक महिलेला जबर मारहाण करून त्या महिलेचा खून केल्या गेलेला आहे असा आरोप मृतक महिलेच्या नातेवाहिकांच्या कडून केल्या जात आहे.

जोपर्यंत आरोपीला अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत या चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालयातील शव विच्छेदन गृहातून आम्ही शव हलविणार नाही असे मत मृतक महिलेच्या नातेवाहिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.पुढिल तपास भिसी पोलिस स्टेशन करीत आहे.

सोमवार, मार्च ०४, २०१९

पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. दीपककुमार खोब्रागडे

पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. दीपककुमार खोब्रागडे

kavyashilp Digital Media

पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन चिमुरात


अध्यक्षपदी प्रा. दीपककुमार खोब्रागडे

चंद्रपूर - जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर यांच्या वतीने पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन दि १६ व १७ मार्च रोजी चिमूर, जि . चंद्रपूर येथे घेण्यात येत आहे़ साहित्यिक, कवी, समीक्षक व विचारवंत तसेच डॉ़ आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जागतिक आंबेडकरवादी कार्यकारी मंडळ व चिमूर येथील संमेलन आयोजकाची नुकतीच बैठक झाली. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस करतील, तर प्रमुख अतिथी ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी राहतील. त्याचप्रमाणे दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे विचारवंत व लेखक अशोक भारती, भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, किशोर गजभिये (आयएएस) विशेष उपस्थिती म्हणून संमेलनात सहभागी होणार आहेत.
प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचा जन्म खापरी (ध) ता . चिमूर येथे झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिकारी चिमूर भागात हे साहित्य संमेलन होत असल्याने आयोजन समितीने त्यांच्या नावाचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला होता़ चिमूर परिसरातील साहित्यिकाची, त्यांचे वाङ्मयातील योगदान लक्षात घेवून निवड केली. खोब्रागडे यांचे एकूण १६ ग्रंथ प्रकाशित आहेत.

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

तुकाराम महाराज वैचारिक भक्त तसेच आवाहनशील योद्धा - खानोरकर

तुकाराम महाराज वैचारिक भक्त तसेच आवाहनशील योद्धा - खानोरकर




चिमूर/रोहित रामटेकेचिमूर:- चिमूर तालुका कुणबी समाज संघटनेच्या वतीने कुणबी समाज बांधवांचा मेळावा तसेच संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन स्थानावरून बोलताना डाँ. धनराज खानोरकर यांनी तुकाराम महाराजांनी त्या काळात जे जनजागृतीचे कार्य केले ते खरोखरच प्रत्येकाने आचरणात आणणे यथावह होईल. तुकाराम महाराज वैचारिक भक्त तसेच एक आवाहनशील योद्धा होते.तुकाराम व गाडगेबाबा यानंतर तसे संत होणे नाही असे अनेक दाखले देऊन तुकाराम महाराजांचे विचार सांगितले.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. राम राऊत नेरी यांनी तुकाराम महाराज हे एका समाजाचे संत नव्हते. संत हे सगळ्यांचे असतात त्यांना विभागू नका असे असे मत व्यक्त केले तर समीर भोयर सचिव यांनी तुकाराम महाराजांचे पारखड विचार व्यक्त करून त्यांच्या विचाराचा वसा घ्या असे समाजबांधवांना सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक यावले यांनी समाजाचे एकीकरण झाले पाहिजे. समाजकर्त्यांनी समाजाची मोठी साखळी निर्माण करून एक वजमुढ बनवा असे सांगून तुकाराम महाराजांचे विचार शेरशायरीतून प्रकट केले.सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी सकाळी शिंदे मंगल कार्यालया पासून ते श्रीहरी बालाजी देवस्थान व परत अशी तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची दिंडीसह कुणबी बांधवांनी जगतगुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. दिंडीचे सूत्रसंचालन विलास वडस्कर व गजानन बाळबुधे यांनी केले. त्यानंतर मान्यवर व कार्यक्रमाचे दिंडीचे स्वागत समारोह मुख्यधपक नथ्थू भोयर व गजानन कारमोरे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.डाँ. धनराज खानोरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ. दीपक यावले, स्वागताध्यक्ष गजानन शिंदे, प्रमुख पाहुणे प्रा.राम राऊत नेरी,समीर भोयर सचिव, रोहित उरकुडे अध्यक्ष युवा कुणबी महासंघ चंद्रपूर, प्रा.डाँ. सुनील पा. झाडे, कृषिभूषण मोरेश्वर झाडे, नागपूर कुणबी महासंघाचे अध्यक्ष कुथे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे, मतभेद, मतभेद विसरून समाजातील वंचित घटकांना प्रवाहात आणणे गरजेचे आहे असे मत डाँ. सुनील झाडे यांनी प्रतिक्रिया दिल्यात. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर भोयर तर सूत्रसंचालन सुवर्णा ढाकुणकर यांनी केले.सदरच्या कार्यक्रमात भोजनदान डाँ. बोढे, शुभाष शेषकर,रमेश भोयर,नगरसेवक विनोद ढाकुणकर आदींनी मोलाचे सहकार्य करून भोजनव्यवस्था कीर्ती रोडगे, स्टेज व्यवस्था डाँ. सुरेश मिलमिले आभार अतकर सर, बचत गट अध्यक्ष संजय दुधनकर, महिला अध्यक्ष नीताताई लांडगे, प्रा. डाँ.चांदभान खंगार, आदींनी तसेच चिमूर तालुका कुणबी समाज संघटना कुणबी युवा संघटना, कुणबी महिला मंडळ,कुणबी मित्र परिवार यांच्या सहकार्याने मोठ्या उत्सहात कुणबी समाज मेळावा व जगतगुरु तुकाराम महाराज जयंती सोहळा मोट्या उत्सहात साजरा करण्यात आला.