चिमूर/रोहित रामटेकेचिमूर:- चिमूर तालुका कुणबी समाज संघटनेच्या वतीने कुणबी समाज बांधवांचा मेळावा तसेच संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन स्थानावरून बोलताना डाँ. धनराज खानोरकर यांनी तुकाराम महाराजांनी त्या काळात जे जनजागृतीचे कार्य केले ते खरोखरच प्रत्येकाने आचरणात आणणे यथावह होईल. तुकाराम महाराज वैचारिक भक्त तसेच एक आवाहनशील योद्धा होते.तुकाराम व गाडगेबाबा यानंतर तसे संत होणे नाही असे अनेक दाखले देऊन तुकाराम महाराजांचे विचार सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. राम राऊत नेरी यांनी तुकाराम महाराज हे एका समाजाचे संत नव्हते. संत हे सगळ्यांचे असतात त्यांना विभागू नका असे असे मत व्यक्त केले तर समीर भोयर सचिव यांनी तुकाराम महाराजांचे पारखड विचार व्यक्त करून त्यांच्या विचाराचा वसा घ्या असे समाजबांधवांना सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक यावले यांनी समाजाचे एकीकरण झाले पाहिजे. समाजकर्त्यांनी समाजाची मोठी साखळी निर्माण करून एक वजमुढ बनवा असे सांगून तुकाराम महाराजांचे विचार शेरशायरीतून प्रकट केले.सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी सकाळी शिंदे मंगल कार्यालया पासून ते श्रीहरी बालाजी देवस्थान व परत अशी तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची दिंडीसह कुणबी बांधवांनी जगतगुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. दिंडीचे सूत्रसंचालन विलास वडस्कर व गजानन बाळबुधे यांनी केले. त्यानंतर मान्यवर व कार्यक्रमाचे दिंडीचे स्वागत समारोह मुख्यधपक नथ्थू भोयर व गजानन कारमोरे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.डाँ. धनराज खानोरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ. दीपक यावले, स्वागताध्यक्ष गजानन शिंदे, प्रमुख पाहुणे प्रा.राम राऊत नेरी,समीर भोयर सचिव, रोहित उरकुडे अध्यक्ष युवा कुणबी महासंघ चंद्रपूर, प्रा.डाँ. सुनील पा. झाडे, कृषिभूषण मोरेश्वर झाडे, नागपूर कुणबी महासंघाचे अध्यक्ष कुथे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे, मतभेद, मतभेद विसरून समाजातील वंचित घटकांना प्रवाहात आणणे गरजेचे आहे असे मत डाँ. सुनील झाडे यांनी प्रतिक्रिया दिल्यात. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर भोयर तर सूत्रसंचालन सुवर्णा ढाकुणकर यांनी केले.सदरच्या कार्यक्रमात भोजनदान डाँ. बोढे, शुभाष शेषकर,रमेश भोयर,नगरसेवक विनोद ढाकुणकर आदींनी मोलाचे सहकार्य करून भोजनव्यवस्था कीर्ती रोडगे, स्टेज व्यवस्था डाँ. सुरेश मिलमिले आभार अतकर सर, बचत गट अध्यक्ष संजय दुधनकर, महिला अध्यक्ष नीताताई लांडगे, प्रा. डाँ.चांदभान खंगार, आदींनी तसेच चिमूर तालुका कुणबी समाज संघटना कुणबी युवा संघटना, कुणबी महिला मंडळ,कुणबी मित्र परिवार यांच्या सहकार्याने मोठ्या उत्सहात कुणबी समाज मेळावा व जगतगुरु तुकाराम महाराज जयंती सोहळा मोट्या उत्सहात साजरा करण्यात आला.