नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
चिमूर/रोहित रामटेके:
चिमूर तालुक्यातील कोटगाव परिसरात चार दिवसांपासून मोठ्या वाघाची दहशत सुरु आहे. चार दिवसामध्ये सहा वाघाचे दर्शन गावातील नागरिकांनी प्रत्येक्षरीत्या केले आहे.
हे वाघ अनेक दिवसापासून दळी मारून बसले आहेत असे वाघ पाहणाऱ्या नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. अनेक दिवसांपासून दळी मारलेल्या वाघाने आज सकाळच्या सुमारास दर्शन दिले, व दुपार वेळात आपले भक्ष एका बकऱ्याला केले व वाघांची संख्या जास्त असल्यामुळे बकऱ्याची हद्दी सुद्धा दिसू दिली नाही. हि बाब गावकऱ्यांना माहित होताच घटनास्थळी लोकांची गर्दी भयानक प्रमाणात दाटली होती.तीन वाघ असल्यामुळे कोटगाव गावातील जनतेमध्ये अतीच प्रमाणात भीतिचे वातावरण दाटले आहे.
गावकऱ्यांची मागणी याप्रमानात आहे की, गावातील वाघाचे विल्हेवाट वनविभागाने तात्काळ लावणे,असे गावातील नागरिकांची महत्वाची मागणी आहे. गावातील सर्व भाग हा नद्यांनाल्यानी व्यापलेला आहे. तरी सुद्धा हि पहिलीच घटना या परिसरात आढळली आहे. कोटगाव गावातील लोकांना नेहमी दळणवळणासाठी जांभुळघाट येथे जावे लागत असते. व ज्या नद्यांच्या भागात वाघ दळून बसला आहे त्या ठिकाणचे शेतकऱ्यांना आपल्या शेतात रात्रौ बे रात्रौ यावे लागत असते या सर्व गोष्टीचे लक्ष ठेऊन प्रत्येक्ष वनविभागाने कार्य करावे अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे.