पवनी/प्रतिनिधी:
पवनी तालुक्यातील गोसेखुद प्रकल्पात मासेमारी करीत असताना वादळे पावसामुळे नाव उलटून झालेल्या अपघातात एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.पांडुरंग वकटू कांबळी (५५) रा.पाथरी हे मुलगा मच्छिंद्र कांबळी(२५) याच्यासोबत धरणात मासेमारीसाठी गेले होते. दरम्यान,वादळे पावसामुळे नाव अनियंत्रित होऊन उलटली. यात मुलगा मच्छिंद्र हा पोहत बाहेर निघाला तर वडील पांडुरंग यांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची नोंद अड्याळ पोलिसांनी केली असून तीन दिवस उलटूनही कांबळी यांचा मृतदेह सापडलेला नाही.
गोसे प्रकल्पबाधित पाथरी गावाचे पुनर्वसन चिचाळ झाले आहे. पाथरी येथे २५ टक्के नागरिक हे मासेमारी करून पोयची खळगी भरतात. प्रकल्पात शेती गेल्याने त्यांचा उदरनिर्वाह मासेमारी करून करतात. कांबळे यांच्या घरच्ह करता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा ,त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलग असा आप्तपरिवार आहे.