चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत आरोग्य विभाग कंत्राटी वाहन चालकांना अत्यल्प कमी वेतन दिल्या जात आहे. त्यातच मागील तिन महिण्यांपासून त्यांचे वेतन थकीत ठेवण्यात आले आहे. त्यामूळे या कर्मचा-यांची वेतन वाढ करुन थगीत असलेले वेतण तात्काळ अदा करावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. यावेळी या कर्मचा-यांचे थगीत वेतन तात्काळ दिल्या जाईल असे आश्वासण मूख्य कार्यकारी अधिकारी यांनी जोरगेवार यांना दिले आहे.
महागाही झपाटयाने वाढत असतांनाच जिल्हा परिषद अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य विभाग कंत्राटी वाहन चालक ७ हजार १०० रुपये इतक्या अत्यल्प वेतनात काम करत आहे. त्यामूळे आता त्यांना त्यांच्या कुटुंबाचे पालन - पोषण करणे कठीण झाले आहे. याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही पडत आहे. यातच मागील तिन महिण्यांपासून त्यांचे वेतन थकीत ठेवण्यात आले आहे. त्यामूळे या कर्मचा-यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ही बाब लक्षात घेवून शासन निर्नयानुसार काल्पनिक कुशल पद गट ( क ) च्या आधारे त्यांना १४,९००/- रुपये मानधन देण्यात यावे तसेच तीन महिण्यांचे थगीत वेतन तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
काल सोमवारी जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली यावेळी वाहण चालकांचीही उपस्थिती होती. या प्रसंगी जोरगेवार यांनी या कर्मचा-यांची वेतन वाढ व तीन महिण्यांपासून थकीत असलेले वेतन तत्काळ अदा करावे अशी मागणी करत निवेदण दिले आहे. वाढीव पगाराबाबत मूख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक भुमिका दाखवली असून या कर्मचा-यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्यात येईल असे आश्वासण जोरगेवार यांना दिले आहे. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, यंग चांदा ब्रिगेडचे अमोल शेंडे, हर्षद कानमपल्लीवार,सुधीर माजरे यांच्यासह वाहण चालकांची उपस्थिती होती.