Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २९, २०१९

अमेझॉन ऍपच्या माध्यमातून करा पैशांची देवाण-घेवाण


ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी 'अमेझॉन'ने लवकरच एक नवी सेवा सुरु करण्याची घोषणा केलीय. भारतात अमेझॉन कंपनी युनिफाईड पेमेंट सर्व्हीसही (यूपीआय) पुरवणार आहे. यामुळे युजर्सला पैशांची देवाण-घेवाण करणे अधिक सोपे होणार आहे. भारतात सध्या अनेक बँक आणि 'पेटीएम' यांसारख्या कंपन्या यूपीआयची सेवा पुरवण्याचे काम करत आहेत. लवकरच, अमेझॉन कंपनीही यूपीआय हॅन्डल सुरु करण्याच्या तयारीत आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर काही युजर्सने या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.


कसा मिळवाल 'अमेझॉन यूपीआय'?
युजर्सला यूपीआयची सेवा सुरु करण्यासाठी 'अमेझॉन यूपीआय ऍप' डाऊनलोड करावा लागेल. यामुळे पैसे पाठवणे आणि मिळवण्याचे काम अधिक सोपे होईल. या ऍपमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, युजर्सला अकाऊंट नंबर सांगण्याची गरज भासणार नाही. युजर्सला यूपीआय ऍपच्या माध्यमातून व्हर्चुअल पेमेंट करता येणार आहे. तसेच व्हर्चुअल पेमेंट ऍड्रेसच्या माध्यमातून तुमच्या अकाऊंटवर पैसे पाठवता येणार आहे. आता कंपनी @apl हॅंडल सुरु करत आहे. युजर्सला त्याचे बँक अकाऊंट ऍमेझॉन यूपीआय अकाऊंटशी लिंक करता येईल. मोबाईल क्रमांक आणि @apl (उदा. 1234512345@apl) असा व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस युजर्सना मिळेल.

गेल्या काही महिन्यांत गुगल कंपनीचे 'गुगल पे' या ऍपच्या माध्यमातून आपल्या युजर्सची संख्या वाढवण्यावर भर दिलाय. इन्स्टंट मॅसेजिंग सेवा देणारी कंपनी 'व्हॉट्सऍपही' ही सुविधा सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर हे काम सुरु आहे. लवकरच या सुविधेचा लाभ सर्वसामान्यांनाही घेता येईल.

सध्या भारतात पेटीएम, फोन पे, अमेझॉन पे, मोबीक्विक, फ्रिचार्ज या वॉलेट कंपन्या कार्यरत आहेत. युजर्सला आकर्षित करण्यासाठी यापैंकी अनेक वॉलेट कंपन्या त्यांच्या युजर्सला कॅशबॅकही देत आहेत

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.