Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २९, २०१९

पालकमंत्री मुनगंटीवार यांचा माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद.

जुबिली हायस्कुल नुतनीकरण प्रकल्प


चंद्रपूर/प्रतिनिधी
येथील ब्रिटिश कालीन वारसा असलेल्या जुबिली हायस्कुल च्या देखण्या वस्तूचे संरक्षण आणि नुतनीकरण करण्यासाठी चंद्रपूर चे पालकमंत्री व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी गुरुवार, 24 एप्रिल रोजी संवाद साधला. चंद्रपूर येथील वन विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये श्री. मुनगंटीवार यांनी शाळेच्या शतकपूर्ती नंतर हाती घेतलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.

या शाळेची ब्रिटिश काळातील इमारत आज मोडकळीस आलेली आहे. इमारतीचे लाकूड व पाया जर्जर अवस्थेत आहे. पण इमारतीची वास्तुरचना ही देखणी आहे. त्यामुळे शाळेच्या मूळ रचनेत बदल न करता शाळेच्या नुतनीकरण प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे मुनगंटीवार यांनी उपस्थितांना सांगितले. या सोबतच शाळेच्या क्रीडांगणावर भव्य असे वातानुकूलित स्टेडियम बांधण्याचा प्रस्ताव देखील त्यांनी जाहीर केला.
या बैठकीच्या सुरुवातीला शाळेच्या नुतनीकरणा साठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मा श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. जयंत मामीडवार व उपाध्यक्ष डॉ. सचिन वझलवार यांनी शाळेमधे मागील वर्षभरात संघटनेतर्फे घेतलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर ना. श्री. मुनगंटीवार यांनी माजी विद्यार्थ्यांना संबोधन करताना शासनाच्या वतीने शाळेचे नुतनीकरण व शाळेमधे अद्ययावत साधन उपलब्ध करून या शाळेला नव्या युगाची शाळा म्हणून नावारूपास आणण्याची आपली योजना सांगितली. हा प्रकल्प मोठा आहे तसेच शैक्षणिक प्रकल्प असल्यामुळे यात प्रत्येक बाबींमध्ये आवड व जाण असलेल्या लोकांची एक समिती देखरेखीसाठी करण्याचेही प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला शाळेचे माजी विद्यार्थी श्री. जगदीश रायठत्ठा, पराग धनकर, अविनाश देशमुख सर, सुदिप रोडे, रामपाल सिंग, तोडासे सर, विजय जुनघरे, सुनिल चटकी, भूषण पिजदूरकर उदय पवार, निलेश बावने, खजान्जी परसूटकर, आशिष मंथनवार व शाळेचे शिक्षक देखील उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.