Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २३, २०१९

नागपुरात ऑफिसला जायला निघालेल्या तरुणीचा ट्रकखाली येऊन मृत्यू

 हेल्मेटही झाले चकनाचूर;ट्रक चालक ताब्यात 
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:
महाराष्ट्र शासनाच्या वाहतूक विभागाकडून हेल्मेट सक्तीसाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबविली जात असून शक्यतो सर्वच दुचाकी वाहनधारक हेल्मेटचा वापर करीत असतांना सर्वत्र दिसून येत आहे.असे असतांनाही अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वाडीत सकाळी १० .३० च्या सुमारास हेल्मेटधारी तरुणी ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच अंत झाला.या घटनेनी शहरात एकच खळबळ उडवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राप्त माहितीनुसार मृतक पूजा उर्फ खुशबू ओमप्रकाश तिवारी वय २८ रा . नवनीत नगर, वाडी ही मागील एक वर्षांपासून वाडी-हिंगणा एमआयडीसी रोडवर स्थित अजमेरा टायर्स मध्ये अकाउंट विभागात काम करीत होती .यापूर्वी तिने सेवा ऑटोमोबाईल येथे काम केले होते.नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता नवनीत नगर येथील घरून होंडा अॅक्टिवा क्रमांक एम .एच .४० बी बी १३३० ने अमरावती महामार्गांने कंपनीत जात असतांना याच सुमारास वडधामना येथील टीसिआय एक्स्प्रेस मधून ओडीसा कडे याच महामार्गांने जात असलेला ट्रक क्रमांक एम . एच .१२ एम व्ही ४६०० च्या मागच्या बाजूच्या लोखंडी हुकला मृतक पूजा हिची ओढणी अटकल्याने ती मागच्या चाकाखाली आल्याने जवळपास ३० मिटर रस्त्यांनी घासत जाऊन तिचा जागीच मृत्यू झाला .

यात तिचे हेल्मेटही चकनाचूर झाले. ओमप्रकाश तिवारी यांना एक मुलगा व एक मुलगी होती .तिवारी कुंटुब हे मूळचे बिहारचे असून ऑर्डनस फॅक्टरी येथे कार्यरत आहे.ट्रकचालक शिवलाल रामप्रसाद शिंदे वय ३० रा . टाकळखेड (चिखली ) जि. बुलढाणा याने घटनास्थळावरून पळ काढत पोलीस स्टेशनला हजर झाला.कलम ३०४ (अ), २७९ नुसार वाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करून वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.
पोल्ट्री फीड 
डेअरी फीड 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.