कार्डिअक अल्ट्रासाउंडमधील स्थान भक्कम
नागपूर – रॉयल फिलिप्स (Royal Philips) (एनवायएसई: PHG, AEX: PHIA) या आरोग्य तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या कंपनीने ईपीआयक्यू सीव्हीएक्स ही अल्ट्रासाउंड प्रणाली आणली आहे. कार्डिओलॉजिस्टसह काम करून ही नवोन्मेषकारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अनाटोमिकल इंटेलिजन्सला असामान्य प्रोसेसिंग पॉवरची जोड देऊन, अपवादात्मकरित्या सुस्पष्ट व तीक्ष्ण प्रतिमा, सुधारित परीक्षण कार्यक्षमता, अधिक दमदार व पुन्हा निर्माण करता येण्याजोगे प्रमाण मापन करणारी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
ईपीआयक्यू सीव्हीएक्समध्ये ट्रुव्ह्यूने युक्त असून यामुळे क्लिनिशिअन्सना हृदयाचे फोटोरिअलिस्टिक चित्र बघता येते. यामध्ये एका नवीन आभासी प्रकाशाच्या स्रोतामुळे उती व एकंदर खोलीचा अंदाज येतो आणि कार्डिअक अनाटोमीचे विश्लेषण अधिक चांगले करता येते. ही प्रणाली अत्याधुनिक ओएलईडी मॉनिटरच्या माध्यमातून कार्डिओलॉजिस्टना उच्च दर्जाच्या प्रतिमा दाखवते आणि याद्वारे प्रतिमा शेजारी शेजारी ठेवून अधिक गतीशील, अधिक व्यापक असा दृष्टिकोन देते.
स्पंदन हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. हर्षवर्धन मर्डीकर म्हणाले, “प्रगत दर्जाच्या प्रतिमांसह ईपीआयक्यू सीव्हीएक्स कार्डिअक अल्ट्रासाउंड सोल्युशन्स भारतातील कार्डिओलॉजिस्ट्सना मानवी शरीराची माहिती अधिक चांगल्या पद्धतीने करून देतील. या कल्पक उत्पादनातील ट्रुव्ह्यू ही सुविधा थ्रीडी अल्ट्रासाउंड प्रतिमांकनाला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाते. वेगवेगळ्या क्लिनिकल परिस्थितींमध्ये एकोकार्डिओग्राफीच्या निदानात्मक क्षमतेवर प्रभाव टाकण्याची क्षमता या सोल्युशनमध्ये आहे.”
फिलिप्स हेल्थकेअरचे भारतीय उपखंडातील अध्यक्ष श्री. रोहित साठे म्हणाले, “कार्डिअक प्रतिमांकनामध्ये कार्डिओलॉजिस्ट्सना वैशिष्ट्यपूर्ण तसेच वाढत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. भारतात सुमारे ६५ दशलक्ष लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. आरोग्यव्यवस्थेवरील ताण वाढत
असल्याने डॉक्टरांना तेवढ्याच वेळात अधिक रुग्ण तपासावे लागत आहेत. फिलिप्स ईपीआयक्यू सीव्हीएक्समुळे क्लिनिशिअन्स अधिक वेगाने आणि सातत्यपूर्ण निदान करू शकतील. सर्व रुग्णांना अपवादात्मक दर्जाची सेवा देण्याचा आत्मविश्वास त्यांना येईल. विशेषत: छोट्या हृदयरुग्णांसाठी हे अधिक उपयुक्त आहे. कारण, छोट्या आकारमानाच्या हृदयांचे प्रतिमांकन अनेकदा आव्हानात्मक ठरू शकते.”
ईपीआयक्यू सीव्हीएक्स अनेक भविष्यकालीन सुविधा देऊ करते. उदाहरणार्थ, डायनॅमिक हार्ट मॉडेल. यामध्ये डाव्या जवनिकेच्या कार्याचे प्रमाण मापन करण्यासाठी अनाटॉमिकल इंटलिजन्सचा वापर केला जातो आणि प्रौढ रुग्णांच्या हृदयासंदर्भात मल्टि-बीट विश्लेषण केले जाते. डायनॅमिक हार्ट मॉडेलमुळे थ्रीडी इजेक्शन फ्रॅक्शन निर्माण करण्यासाठी लागणारा वेळ ८३ टक्क्यांनी कमी झाल्याचे सिद्ध झाले आहे. इजेक्शन फ्रॅक्शन हे एक महत्त्वाचे प्रमाण मापन उपयोजन असून, हृदय कशा पद्धतीने रक्ताचे पंपिंग करत आहे हे याद्वारे जाणून घेता येते. हे अत्यंत मजबूत व पुन्हा निर्माण करता येण्याजोगे साधन असून, कार्डिअक अऱ्हिथमियाच्या रुग्णांसाठीही उपयुक्त आहे.
या प्रणालीमध्ये नवीन एसनाइन-टू प्युअरवेव्ह प्रोबचाही समावेश आहे. यामुळे लहान मुलांच्या हृदयविकाराचे परीक्षण सुलभ होते. यात सिंगल-क्रिस्टल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उच्चस्तरीय तपशील आणि काँट्रास्ट रिझोल्युशन दाखवले जाते. यामुळे उतींची अधिक सखोल माहिती मिळते आणि एक बटन दाबून कोरोनरी सब-मोड ऑन केल्यास कोरोनरी धमन्यांचे दृश्यीकरण (व्हिज्युअलायझेशन) अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. एकंदर स्कॅनिंग वेगाने होते व कार्यप्रवाह सुधारतो.
ईपीआयक्यू सीव्हीएक्समध्ये एक खास हृदयविकारांसाठी म्हणून यूजर इंटरफेस आहे. यामुळे परीक्षणाचा अनुभव एका यूजर-कन्फिगरेबल टच-स्क्रीन इंटरफेसद्वारे सुलभ होऊन जातो आणि क्लिनिशिअन्सना ही नियंत्रणे स्वत:च्या सोयीने व गरजेप्रमाणे करून घेऊन (पर्सनलाइझ) कार्डिअक परीक्षणांचा कार्यप्रवाह सुधारता येतो. फिलिप्सने कडक सुरक्षितता क्षमता व नियम देऊन प्रायव्हसी व सुरक्षिततेप्रती असलेली बांधिलकीही पुन्हा दाखवून दिली आहे.
फिलिप्स ही विशाल इन्स्टॉल्ड बेस आणि उद्योगक्षेत्रात अनेक गोष्टींचा पाया घालण्याचा लौकिक यांसह अल्ट्रासाउंड सोल्युशन्समधील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीचा अल्ट्रासाउंड पोर्टफोलिओ प्रभावी तसेच कार्यक्षम रुग्णसेवेला मदत करणारा असून, रेडिओलॉजी, कार्डिओलॉजी, पॉइंट-ऑफ-केअर आणि स्त्रीरोग/प्रसूतीशास्त्र या विभागातही कंपनीच्या व्यापक स्पेशालिटीज वापरल्या जात आहेत.