- उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने NOx कपातीच्या तंत्रज्ञानावर चर्चा करण्यासाठी तसेच जागरूकता वाढवण्यासाठी उद्योगजगतातील यंत्रणा व औष्णिक ऊर्जा प्रकल्प चालवणाऱ्या कंपन्या आल्या एकत्र
- एनटीपीसीसोबत प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात आला
मुंबई : फोर्टम ही फिनीश ऊर्जा कंपनी आपले गुणवत्ता सिद्ध केलेले NOx कपात तंत्रज्ञान भारतात ‘फोर्टम ईनेक्स्ट’ या नवीन व्यवसायाच्या माध्यमातून घेऊन येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कंपनीने दिल्ली व मुंबईत दोन परिषदांचे आयोजन केले. या परिषदांना या उद्योगातील तज्ज्ञ, नियामक तसेच प्रदूषणविषयक यंत्रणांचे प्रतिनिधी आणि ऊर्जानिर्मिती कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. फोर्टमच्या जागतिक दर्जाच्या नवोन्मेषकारी तंत्रज्ञानाचे तसेच सर्वंकष प्रणालींचे दर्शन सर्वांना करून देण्याच्या उद्देशाने या परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील औष्णिक ऊर्जाप्रकल्पांसाठी उपयुक्त उत्पादनांवर त्यांचा विशेष भर होता.
“पुढील ३० वर्षे भारतामध्ये तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या ऊर्जांमध्ये औष्णिक ऊर्जेचा वाटा सर्वाधिक राहणार आहे. कोळशासारखी जीवाष्म इंधने जाळल्यामुळे आम्लयुक्त पाऊस होतो आणि हा पृथ्वीचे तापमान वाढवणाऱ्या हरितगृह उत्सर्जनाचा सर्वांत मोठा स्रोतही आहे. अनेक देशांनी यापूर्वीच नायट्रोजन ऑक्साइड्सच्या उत्सर्जनावर कडक मर्यादा घातली आहे; आणि म्हणून NOx कपात तंत्रज्ञानांचा वापर व्यापक स्तरावर केला जात आहे. स्वच्छ ऊर्जेचे उद्दिष्ट डोक्यात ठेवून भारतानेही अलीकडेच NOx उत्सर्जनावर मर्यादा आणल्या आहेत. यासाठी कोळशाचे ज्वलन करणाऱ्या बहुतेक प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञानांचा अवलंब केला जाईल,'' असे फोर्टम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय अगरवाल म्हणाले.
हे लक्षात घेऊन तसेच NOx ज्वलनाचा परिणाम कमी करण्याच्या नियोजन व अंमलबजावणीतील आमच्या कौशल्याच्या जोरावर आम्हाला आमचे कल्पक व वेळ-पैसा वाचवणारे NOx तंत्रज्ञान भारतात आणण्यास आवडेल. यामुळे उत्सर्जनाची पातळी कमी करण्यात मदत होईल आणि पर्यायाने भारताला आपली शाश्वततेसंदर्भातील उद्दिष्टे गाठण्यातही मदत होईल. आम्ही एनटीपीसीसोबत प्रायोगिक तत्त्वावर केलेला प्रकल्प यशस्वी होणे हे आमच्या दृष्टीने भारतातील पर्यावरण तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत उतरण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेले यश होते. भारतातील कोळशाचे ज्वलन करणाऱ्या प्रकल्पांना उत्सर्जन कमी करून हवा स्वच्छ ठेवण्यास सक्षम करण्याचा हा भाग आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
फोर्टम ईनेक्स्टच्या आशिया विभागाचे क्षेत्र संचालक श्री. जुहा सुओमी भारताला दिलेल्या भेटीदरम्यान म्हणाले, “भारत ही आमच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे आणि आमच्या प्रणालीचा वापर करून भारताला २०२२ सालापर्यंत उत्सर्जनाची त्यांनी निश्चित केलेली मानके पूर्ण करण्यासाठी मदत करण्यास आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. नुकत्याच झालेल्या कायद्याची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट ठेवून भारत पुढील ५ वर्षांत म्हणजेच खूप कमी कालावधीत NOx उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. युरोपने जे ३० वर्षांत साध्य केले, ते साध्य करण्यासाठी भारताने स्वत:ला ५ वर्षांचा कालावधी दिला आहे. फोर्टमचे प्रगत NOx तंत्रज्ञान उत्सर्जन प्रभावीरित्या कमी करते. पर्यायी उपायांशी तुलना केल्यास यामध्ये नवीन उपकरणांची गरज कमीत-कमी भासते, अतिरिक्त वीजवापर होत नाही, पाण्याचा वापर केला जात नाही. त्याचप्रमाणे अमोनिया किंवा युरियाचा वापर या सोल्युशन्समध्ये केला जात नसल्याने बाय-प्रोडक्ट्स निर्माण होत नाही व त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्नही येत नाही. ”
२०१७ मध्ये एनटीपीसीने फोर्टम ईनेक्स्टला आपल्या रामागुंदम ऊर्जाप्रकल्पातील २X२०० मेगावॅट ई-वॉल फायर्ड बॉयलर्स तसेच १x५०० ई-मेगावॅटच्या टँजेन्शिअल फायर्ड बॉयलर प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करून दिले. फोर्टमचे दीर्घकाळापासून वापरले जाणारे NOx कपात तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेसाठी अनुकूल आहे का, हे तपासण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. फोर्टमने या अभ्यासादरम्यान अनेक स्थानिक कोळसा कारखान्यांमध्ये विविध प्रकारचे क्षेत्र माहिती विश्लेषण केले तसेच विविध चाचण्या वेगवेगळ्या परिस्थितीत घेतल्या. उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाच्या बदलत्या प्रमाणात नायट्रोजन उत्सर्जनाचे मापन करण्यात आले. तसेच बर्नर तंत्रज्ञानासोबत कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक मॉडेलिंगची सांगड घालण्यात आली. अभ्यासांती असे दिसून आले की, भारतातील कोणत्याही स्थानिक ऊर्जाप्रकल्पावर या तंत्रज्ञानाचा वापर केला असता, भारत सरकारने निश्चित केलेल्या NOx उत्सर्जनाच्या पातळीची पूर्तता करणे शक्य आहे.