नाशिक-प्रतिनिधी
नुकताच दि .10 मार्चला ग्रंथभूषण मु शं औरंगाबादकर सभागृह , नाशिक येथे भारतीय पत्रकार संघातर्फे 'सावित्री गौरव राष्ट्रीय पुरस्कार ' सोहळा संपन्न झाला. जागतिक महिला दिन व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात नागपूरच्या साहित्यिक वर्षा किडे कुळकर्णी यांना 'सावित्री गौरव राष्ट्रीय पुरस्कार' देवून सन्मानित करण्यात आले.भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे, आयबीएन लोकमतचे विशाल परदेशी, जेष्ठ साहित्यिक डॉ. वेदश्री थिगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र, भारत व विदेशातील साहित्य, कला ,संस्कृती, क्रीडा, उद्योग, सामाजिक, न्याय, कायदा, शिक्षण, चित्रपट, दूरदर्शन, संगीत, दिग्दर्शन,पत्रकारिता, राजकारण अशा विविध क्षेत्रातील राज्य, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सावित्रींच्या लेकींना सावित्री गौरव राष्ट्रीय पुरस्कारान सन्मानित करण्यात आले. विदर्भातील फक्त तिघींपैकी नागपूरचे प्रतिनिधित्व वर्षा किडे कुळकर्णी यांनी केलं . दरवर्षी दिल्लीत घेण्यात येणारा हा कार्यक्रम प्रथमच महाराष्ट्रात नाशिक येथे भारतीय पत्रकार संघाच्या नाशिक शाखेने आयोजित केला होता.