चंद्रपूर/प्रतिनिधी:
पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रकिये दरम्यान नुकतेच महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहे. दिनांक १८ जानेवारी २०१९ रोजी गृह विभागाव्दारे निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाव्दारे पोलीस दलात सुधारणा करण्याकरीता नियम करण्यात आले असुन या नियमांना महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०१९ असे संबोधण्यात आले आहे.पोलीस शिपाई सेवा प्रवेशा करीता प्रथम शंभर गुणाची शारिरीक चाचणी घेण्यात येत
होती.
पंरतु दि. १८ जानेवारी २०१८ च्या आदेशान्वये यापुढे पोलीस शिपाई सेवा प्रवेशाकरीता उमेदवारांची प्रथम शंभर गुणांची लेखी परिक्षा घेण्यात येणार असुन त्यानंतर पन्नास गुणांची शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी परिक्षा ही अंकगणित, सामान्य ज्ञान व चालु घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरणावर आधारित असेल तर शारिरीक चाचणीमध्ये पुरूषांकरीता १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक व महिलांकरीता ८०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेकचा समावेश असेल.सदचा आदेश हा महाराष्ट्र पोलीस दल यांचे संकेत स्थळ http://www.mahapolice.gov.inतसेच चंद्रपुर जिल्हा पोलीस दल यांचे संकेत स्थळ https://chandrapurpolice.gov.in यावर उमेदवारांकरीता प्रसिध्द करण्यात आले.