राज्यभरातून २५ हजारावर समाजबांधव उपस्थित राहणार
सूर्यकांत खनके असणार महासंमेलनाचे स्वागताध्यक्ष
चंद्रपूर/प्रतिनिधी:
तेली समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चिंतनासाठी विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूर व पोंभुर्णा शाखेच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८फेब्रुवारी रोजी पोंभुर्णा येथे श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी पर्व तेली समाज एकता महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर मंदिरासमोरील पटांगणावर होणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून २५ हजारांवर समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
अन्यायाच्या प्रतिकारार्थ समाजबांधवांनी संघटित होवून एकतेचे प्रदर्शन घडविण्यासाठी या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता या महासंमेलनाचे उद्घाटन माजी आमदार देवराब भांडेकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विदर्भ तेली महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे राहणार असून, महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके महासंमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. प्रमुख वक्ते म्हणून महासंघाच्या गोंदिया येथील संघटिका प्रा. निशाताई भुरे, नागपूर येथील शुभांगी घाटोळे उपस्थित राहणार आहेत. या महासंमेलनानिमित्त छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री ताम्रध्वज साहू, संताजी जगनाडे महाराजांचे चौदावे वंशज तथा संदुबरे येथील तेली समाजाचे संस्थाध्यक्ष जनार्धन गोपाळराव जगनाडे व तेली समाज महासंघाचे राष्टीय अध्यक्ष चरणलाल साहू यांचा सत्कार केला जाणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून महिला जिल्हाध्यक्ष मिनाक्शी गुजरकर,युवक फ्रंटचे जिल्हाध्यक्ष विनोद बुटले, मूल कृउबासचे सभापती घनश्याम येनुरकर, डॉ. विश्वास झाडे, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षा रिता उराडे,देवाडा खुर्द येथील सरपंच विलासमोगरकर, डॉ. प्रभुदास चिलबुले,चिमूरचे तालुकाध्यक्ष धनराज मुंगले यांची उपस्थिती राहणार आहे. या महासंमेलनात एकतेचे प्रदर्शन घडविण्यासाठी समाजबांधवांनीहजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हाविदर्भ तेली समाज महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. नामदेव वरभे,महासचिव गंगाधर कुनघाडकर,सचिव ओमप्रकाश मांडबकर, कोषाध्यक्ष प्रा. राम नंदेश्वर, गिरडकर यांनी केले आहे.